Tumbbad Re Released Saam Tv
मनोरंजन बातम्या

Tumbbad Movie : RHTDM नंतर आता तुंबाड पुन्हा येतोय, थेटरमध्ये प्रेक्षकांना पुन्हा घाबरवण्यास सज्ज, प्री बुकींगला सुरूवात!

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

'तुंबाड'हा चित्रपट बॉलिवूड आणि मराठी बॉक्स ऑफिसवर जबरदस्त हिट ठरला होता. हा चित्रपट २०१८मध्ये चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला होता. प्रेक्षकांकडून या चित्रपटाला भरपूर पसंती मिळाली होती.चित्रपटाच्या चाहत्यांसाठी एक खूशखबर आहे.'तुंबाड'चित्रपट पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.काही दिवसांपूर्वी 'तुंबाड' चित्रपटाचा नवा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला होता. या चित्रपटाच्या दमदार आवाज आणि डिझाईनमुळे चाहत्यांमध्ये पुन्हा एकदा उत्सुकता निर्माण झाली आहे. हा चित्रपट येत्या १३ सप्टेंबरला थिएटरमध्ये पुन्हा रिलीज होणार आहे. दरम्यान'तुंबाड' २०१८ चा बेस्ट हॉरर कॉमेडी चित्रपट ठरला होता.

दिगदर्शक अनिल बर्वे यांनी 'तुंबाड' चित्रपटाचे दिगदर्शन केले होते.'तुंबाड' चित्रपटाने ६४ वा फिल्मफेयर ॲवॉर्ड्समध्ये अनेक पुरस्कार जिंकलेत. त्यानंतर वेनिस इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलच्या ७५ व्या वर्षाच्या कार्यक्रमात हा चित्रपट (Movies) प्रदर्शित करण्यात आला होता. माहितीनुसार,या चित्रपटाच्या निर्मात्यांनी तब्बल ५ कोटी रुपयांचा खर्च (Expenses)केला होता.

रिपोर्ट्सनुसार, 'तुंबाड' चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जवळपास १३.५७ कोटींचा गल्ला गाठला होता. तुंबाड चित्रपटाचे दिगदर्शन आणि कथानक राही अनिल बर्वेने लिहिली आहे. त्यांनी या चित्रपटाची कथा १९९७मध्ये लिहिली होती. तुंबड चित्रपटाची शुटिंग (Shooting) २०१५ मध्ये सुरू केली होती. परंतु चित्रपटाच्या प्री- प्रॉडक्शनसाठी ३ वर्ष लागले होते.चित्रपटाच्या कथेमधील तथ्य शोधण्यासाठी खूप वेळ लागला आणि या कारणामुळे चित्रपट २०१८ मध्ये प्रिदर्शित करण्यात आला होता. तुंबड चित्रपटाची शुटिंग गृहेत करण्यात आली होती.

तुंबाड चित्रपटाला चाहत्यांकडून भरभरुन प्रतिसाद मिळाला होता.चित्रपटामधील कलाकारांच्या अभिनयाला प्रेक्षकांनी पंसती दिली होती. सोहम शाह याने या चित्रपटामध्ये मुख्य भूमिका (Preface) साकारली होती.या चित्रपटाची कथा (Story) आगळी वेगळी असल्यामुळे प्रेक्षकांनी चित्रपटाला भरभरुन प्रतिसाद दिला होता.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sukanya Samruddhi Yojana: १० हजार १५ वर्षे भरा, २१ व्या वर्षी मुलीच्या खात्यात तब्बल ३८ लाख; जाणून घ्या सरकारची भन्नाट योजना

Maharashtra Politics : महायुतीच्या जागावाटपाचं घोडं कुठं अडलं? कोणत्या पक्षाला काय हवं?

Mumbai Metro News: मुंबईकरांसाठी गुड न्यूज! 'मेट्रो ३' आरे ते बीकेसी टप्पा लवकरच सुरु होणार; ऑक्टोंबरमध्ये PM मोदी करणार लोकार्पण

Maharashtra Politics : अमित शहा पुन्हा महाराष्ट्र दौऱ्यावर येणार; महायुतीत काहीतरी मोठं घडणार, नेमकं काय?

Petrol Diesel Price : विधानसभेच्या आधी राज्य सरकार मोठा निर्णय घेणार, पेट्रोल-डिझेलच्या दरात कपात?

SCROLL FOR NEXT