Tripti Dimri SAAM TV
मनोरंजन बातम्या

Tripti Dimri : 'ॲनिमल' फेम तृप्ती डिमरीचा 'मेरे मेहबूब' गाण्यावर जबरदस्त डान्स; VIDEO पाहून नेटकरी म्हणाले, तौबा तौबा...

Shreya Maskar

ॲनिमल चित्रपटातून प्रसिद्धीच्या झोकात येणार अभिनेत्री तृप्ती डिमरी (Tripti Dimri ) हिने आपल्या अभिनय आणि डान्सने प्रेक्षकांच्या मनावर जादू केली आहे. सध्या ती एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आली आहे. सध्या ती 'विक्की विद्या का वो वाला व्हिडिओ' (Vicky Vidya Ka Woh Wala Video) या चित्रपटामुळे चांगलीच चर्चेत आहे. नुकतेच या चित्रपटातील तिचे 'मेरे मेहबूब' हे गाणे रिलीज झाले आहे. यावर अनेक कमेंट्स येताना पाहायला मिळत आहेत.

तृप्तीच्या 'मेरे मेहबूब' (Mere Mehboob) गाण्याच्या डान्स मूव्ह्स पाहून यूजर्सनी आपली नाराजी व्यक्त केली आहे. या गाण्यावर तृप्ती भन्नाट डान्स मूव्ह्स करताना पाहायला मिळत आहे. यामुळे तिला सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आले आहे. हे गाणे राजकुमार राव आणि तृप्ती डिमरी यांच्यावर चित्रित करण्यात आला आहे. पण या गाण्यात तृप्ती ज्या पद्धतीने डान्स करत आहे, ते युजर्सना अजिबात आवडलं नाही.

या गाण्यावर अनेक नाराजीच्या स्वरातील कमेंट्स येत आहेत. या डान्सच्या व्हिडीओवर एका युजरने कमेंट केली की, "कृपया डान्स करू नका." तर दुसऱ्या युजरने "कोरिओग्राफी खूपच खराब आहे" असे म्हटले. तर काहींनी "हे तुझ्याकडून होणार नाही" असे देखील म्हटले आहे. अशा अनेक कमेंट्स नेटकऱ्यांनी केल्या आहेत.

तृप्तीच्या डान्स मूव्हची खिल्ली उडवताना नेटकरी पाहायला मिळत आहेत. तृप्ती डिमरीचा आगामी चित्रपट 'विकी विद्या का वो व्हिडिओ' चित्रपट 11 ऑक्टोबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा रोमँटिक कॉमेडी ड्रामा चित्रपट आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PM Modi pune Tour : पंतप्रधान मोदींचा पुणे दौरा; वाहतुकीत मोठा बदल, पर्यायी मार्ग काय? वाचा

Heavy Rain In Pune: पुण्यात पावसाची धुवाँधार बॅटिंग; अवघ्या ३ तासात १२४ मिलिमीटर पाऊस, रस्त्यांना नदीचं स्वरूप, सोसायटीमध्ये शिरलं पाणी

laxman hake : मोठी बातमी! मनोज जरांगे पाटील यांच्यानतंर लक्ष्मण हाकेंनी सोडलं उपोषण, VIDEO

Solapur News : नदीच्या पुरात अडकली ॲम्बुलन्स

Marathi News Live Updates: ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांचं आंदोलन स्थगित

SCROLL FOR NEXT