Rajasthan News: बायकोच्या रील्सवर नेटकऱ्यांच्या अश्लिल कमेंट्स, सरकारी कर्मचाऱ्याने लाइव्ह करत उचललं टोकाचं पाऊल

Raini Crime News: इन्स्टाग्राम (Instagram) हे मनोरंजनाचे एक उत्तम साधन आहे. पण यामुळे अनेक कुटुंब उद्ध्वस्त देखील झाले आहेत. इन्स्टाग्रामवरील याच रील्समुळे एका सरकारी कर्मचाऱ्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना राजस्थानमध्ये घडली आहे.
Rajasthan Crime
Rajasthan CrimeSaam Tv

Rajasthan Crime News:

सोशल मीडिया (Social Media) हे असं प्लॅटफॉर्म आहे ज्याठिकाणी प्रत्येक व्यक्ती अॅक्टिव असते. फेसबुक असो, एक्स अकाऊंट असो किंवा इन्स्टाग्राम याठिकाणी अनेक जण फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असतात. सध्या इन्स्टाग्रामचा जमाना आहे. इन्स्टाग्रामवर वेगवेगळ्या प्रकारचे रील्स तयार करून पोस्ट केले जातात. अनेकांना तर या रील्सचे वेड लागले आहे. अगदी शहरापासून ते गावापर्यंत प्रत्येक व्यक्तीला रील्स तयार करणे आवडते. इन्स्टाग्राम (Instagram) हे मनोरंजनाचे एक उत्तम साधन आहे. पण यामुळे अनेक कुटुंब उद्ध्वस्त देखील झाले आहेत. इन्स्टाग्रामवरील याच रील्समुळे एका सरकारी कर्मचाऱ्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना राजस्थानमध्ये घडली आहे.

राजस्थानच्या अलवरमध्ये एका सरकारी कर्मचाऱ्याने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. सिद्धार्थ दौसा असं या व्यक्तीचे नाव आहे. हा सरकारी कर्मचारी रैनी परिसरातील नांगल बस गावात राहत होता. तो आरोग्य विभागामध्ये काम करत होता. त्याच्या पत्नीला रील्स बनवण्याची आवड होती. पण सिद्धार्थला त्याच्या पत्नीचे रील्स बनवणे अजिबात आवडत नव्हते. तो तिला रील्स बनवण्यास विरोध करत होता पण ती ऐकत नव्हती. त्यामुळे त्यांच्यात सतत वाद होते. वाद ऐवढा वाढला की त्याची पत्नी रागामध्ये माहेरी निघून गेली. त्यानंतर सिद्धार्थने आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी पत्नीच्या रील्सवर अश्लिल कमेंट्स करणाऱ्यांना त्याने उत्तर देखील दिले.

Rajasthan Crime
Chennai News: चेन्नई रेल्वे स्टेशनवर 4 कोटींची रोकड जप्त, भाजप कार्यकर्त्यांसह 3 जणांना अटक

या प्रकरणी सिद्धार्थच्या कुटुंबीयांनी राणी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करत तपास सुरू केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आत्महत्येच्या दोन-तीन दिवसांपूर्वी सिद्धार्थने 11:45 वाजता सोशल मीडियावर लाइव्ह पोस्ट देखील केली होती. ज्यामध्ये त्याने पत्नी माया आणि रत्तीराम अमला यांना आपल्या मृत्यूसाठी जबाबदार धरले होते. त्याची लाइव्ह पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. पोलिस सध्या या प्रकरणाचा कसून तपास करत आहेत.

Rajasthan Crime
Allahabad High Court: हिंदू विवाहात 'कन्यादान' नाही, 'सात फेरे' आवश्यक; उच्च न्यायालयाने असं का म्हटलं?

पोलिसांनी पुढे सांगितले की, नांगल बस येथे राहणारा सिद्धार्थ हा वैद्यकीय विभागात एलडीसी म्हणून कार्यरत होता. सिद्धार्थचा भाऊ आणि त्याची पत्नी माया यांच्यामध्ये सतत वाद व्हायचे. आत्महत्यापूर्वी सिद्धार्थने सोशल मीडियावर लाइव्ह करत सांगितले होते की, त्याची पत्नी रील्स बनवते आणि सोशल मीडियावर पोस्ट करते. जे चुकीचे आहे. तो पत्नीला म्हणाला होता की, तू माझ्याकडे बघत आहेस तर ऐक माझ्यासाठी माझे कुटुंब पहिले आहे. माझ्यापासून घटस्फोट घे. यानंतर सिद्धार्थने त्याच्या मृत्यूसाठी पत्नी आणि रत्तीराम अमलाला जबाबदार धरले.

Rajasthan Crime
PM Narendra Modi : लोकसभा निवडणूक प्रचारात मोदींना आठवले मणिपूर; म्हणाले, संवेदनशील मुद्द्यावर...

सिद्धार्थची पत्नी मायाचे इन्स्टाग्रामवर 56,000 फॉलोअर्स आहेत. पत्नी नेहमीच रीलमध्ये व्यस्त असायची आणि काही लोक तिच्या पोस्टवर घाणेरडे कमेंटही करायचे. त्यामुळे पती-पत्नीमध्ये दररोज भांडणे होत होते. काही दिवसांपूर्वी घरात भांडण झाले होते. याबाबत पत्नी माया हिच्यावतीने पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली होती. पत्नीच्या सोशल मीडिया अकाऊंटवर येणाऱ्या अश्लिल कमेंट्समुळे सिद्धार्थ नाराज झाला होता. आत्महत्येपूर्वी लाइव्ह येत सिद्धार्थने अश्लिल कमेंट्स करणाऱ्यांना म्हटले होते की, 'जेव्हा हे तुमच्या घरात होईल तेव्हाच तुम्हाला समजेल. मी माझे कुटुंब तुटू देणार नाही. म्हणूनच मी माझा जीव देऊ शकतो.

Rajasthan Crime
IGI Airport Delhi : दिल्लीतील आंतराराष्ट्रीय विमानतळाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी; दोघांना अटक

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com