Amazon Prime SAAM TV
मनोरंजन बातम्या

Amazon Prime वर 5 धमाकेदार वेबसीरिजचा जलवा, वीकेंडला तुम्ही सुद्धा नक्की पाहा...

Top 5 Best Web Series : या वीकेंडला अ‍ॅमेझॉन प्राइमच्या खास वेब सीरिजचा आनंद लुटा. यादी आताच नोट करा.

Shreya Maskar

वीकेंडला काय करायचं? हा प्रश्न प्रत्येकाला पडतो. प्रत्येक वीकेंडला बाहेर जाणे शक्य होत नाही. त्यामुळे घरीच राहून तुम्ही मस्त वीकेंड एन्जॉय करू शकता. तुम्ही अ‍ॅमेझॉन प्राइमाच्या (Amazon Prime) या बेस्ट वेब सीरिजची ( Web Series) मेजवानी लुटा. क्राइम आणि हॉरर सीरिज आहेत.

पाताल लोक

पाताल लोक ही हॉरर सिरीजने अनेकांच्या मनावर राज्य केले आहे. तुम्ही ही सिरीज पाहिली पाहिजे. या सिरीजमध्ये अभिषेक बॅनर्जी यांची महत्त्वाची भूमिका आहे. या सीरिजचा पहिला सीझन लॉकडाऊनमध्ये प्रदर्शित झाला होता. आता प्रक्षेक दुसऱ्या सीझनची आतुरतेने वाट पाहत आहेत. पाताल लोक सीरिज अनुष्का शर्माच्या प्रोडक्शन हाऊसच्या अंतर्गत बनवण्यात आली होती.

द फॅमिली मॅन

फॅमिली मॅन या सीरिजमध्ये मनोज बाजपेयी मुख्य भूमिकेत आहेत. यात त्यांनी अंडरकव्हर एजंटचे पात्र साकारले आहे. द फॅमिली मॅन सीरिजचे दोन सीझन झाले आहेत. आता तिसऱ्या सीझनची चाहते वाट पाहत आहेत. हा सीझन देखील लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

इनसाइड एज

इनसाइड एज या वेब सिरीजचे आतापर्यंत तीन सीझन झाले आहेत. तिन्ही सीझन खूप गाजले आहेत. यात विवेक ओबेरॉय, रिचा चड्ढाआणि सयानी गुप्ता हे तिघे मुख्य भूमिकेत दिसले आहेत.

मिर्जापुर

मिर्जापुर ही सर्वात गाजलेली वेब सीरिज आहे. आता पर्यंत याचे ३ भाग आले आहेत. प्रत्येक भागातील कथा प्रेक्षकांचे मन जिंकते. हे तिन्ही सीझन सुपरहिट ठरले आहेत. यात तुम्हाला दोन कुटुंबातील वाद पुढे गुन्हेगारीत रूपांतरित होतो हे पाहायला मिळाले आहे. या सिरीजमध्ये जबरदस्त ॲक्शन दाखवली आहे. मिर्झापूरमध्ये पंकज त्रिपाठी, अली फजल आणि श्वेता त्रिपाठी महत्त्वाच्या भूमिकेत दिसले आहेत.

अधूरा

अधूरा ही सीरिज हॉरर आहे. यात रसिका दुग्गल, राहुल देव आणि पूजन छाबरा मुख्य भूमिकेत आहेत. या चित्रपटात गुन्हेगारी दाखवण्यात आली आहे. या सीरिजला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Exit Poll Maharashtra : दापोली विधानसभा मतदारसंघाचे संभाव्य आमदार कोण? पाहा Exit Poll

Maharashtra Exit Poll: रत्नागिरी मतदारसंघातून उदय सामंत होणार आमदार? पाहा Exit Poll

Maharashtra Exit Poll: गोदिंयामधून भाजपचे विनोद अग्रवाल होणार आमदार? पाहा Exit Poll

Mankhurd Exit Poll: अबू आझमी की नवाब मलिक, मानखुर्द विधानसभा मतदारसंघाचे संभाव्य आमदार कोण?

Saam Exit Poll : सांगलीत भाजप मारणार बाजी? एक्झिट पोलमध्ये कौल कुणाला?

SCROLL FOR NEXT