Samantha Prabhu : नागा चैतन्यचा साखरपुडा झाला, एकट्या पडलेल्या समंथानेही जोडीदार निवडला, तो 'फॅमिली मॅन' आहे तरी कोण?

Samantha Ruth Prabhu Relationship Updates : गेल्या काही महिन्यापासून समंथा आणि नागा चैतन्याच्या नाते संबंधाबद्दल मोठ्या प्रमाणात चर्चा सुरु होती.त्यानंतर पुन्हा एकदा अभिनेत्री समंथा प्रभुच्या नात्याबद्दल चर्चा सुरू झालेली आहे.
Samantha Ruth Prabhu Relationship Updates
Samantha Ruth Prabhu Saam Tv
Published On

दाक्षिणात्य प्रसिद्ध अभिनेत्याबद्दल गेल्या काही महिन्यापासून मोठ्या प्रमाणात चर्चा सुरु आहे. अर्थात तो दाक्षिणात्य स्टार नागा चैतन्य आहे. ८ ऑगस्ट रोजी अभिनेता नागा चैतन्य आणि अभिनेत्री शोभिता धुलीपाला या दोघांचा साखरपुडा पार पडला. यानंतर नागा चैतन्यची एक्स वाईफ अभिनेत्री समंथा रुथ प्रभुनेही तिच्या आयुष्यात पुढे जाण्याचा निर्णय घेतला आहे.

Samantha Ruth Prabhu Relationship Updates
Big Boss Marathi 5: बिग बॉस मराठीच्या घरात रडारडी; घरच्यांना फोन लावताच अश्रूंचा बांध फुटला

नागा चैतन्य आणि समंथाने त्यांच्या नात्याला पूर्णविराम दिल्यानंतर नागा चैतन्यने(Naga Chaitanya) त्याच्या आयुष्याची नवीन सुरुवाती केली,तर त्यानंतर समंथाच्या आयुष्याबद्दल अनेक चर्चा होऊ लागली होती मात्र आता समंथाही तिच्या वैवाहिक आयुष्याला पुन्हा एका सुरुवात करणार असल्याची चर्चा रंगली आहे. समंथाचे नाव सध्या एका दिग्दर्शकासोबत जोडले जात आहे.

समंथाच्या आयुष्यात नव्या प्रेमाची एन्ट्री?

अभिनेता नागा चैतन्यसोबत घटस्फोट झाल्यानंतर आणि आजारपणामुळे समंथा कठीण स्थितीतून जात होती,यामुळे चाहत्यांना समंथाची खूप काळजी वाटत होती. नागा चैतन्याच्या साखरपुड्यानंतर समंथाने आता तिच्या आयुष्याच पुढे जाण्याचा निर्णय घेतला आहे. मीडिया रिपोर्टनुसार, प्रसिद्ध वेबसिरीज'द फॅमिली मॅन' चा दिग्दर्शक 'राज' आणि समंथाच्या अफेरची चर्चा सध्या जोरदार सुरु आहे.

दिग्दर्शक राज यांनी डीकेसोबत 'द फॅमिली मॅनचे' दिग्दर्शन(Direction) केले होते. सोबतच राज आणि समंथा या दोघांनी दोन ओटीटी प्रोजेक्टसाठी काम केले होते. समंथा यापूर्वी 'द फॅमिली मॅन २' मधून ओटीटीवर पदार्पण केले होते. सध्या समंथा यानंतर दिग्दर्शक राज यांच्या 'सिटाडेल:हनी बन्नी'मध्ये पुन्हा प्रेक्षकांना दिसून येणार आहे.

मीडिया वृत्तानुसार, दिग्दर्शन राज हे समंथाच्या प्रेमात पडले असल्याचे म्हटले जात असल्याचे समजेत मात्र राज आणि समंथा यांच्या या चर्चेत खरचं किती तथ्य आहे हे समजू शकलेले नाही.महत्त्वाचे म्हणजे या दोघांनीही त्यांच्या रिलेशनशीपच्या चर्चेवर कोणतेही भाष्य केलेले नाही.

नागा चैतन्यसोबत घटस्फोट...

अभिनेत्री समंथा आणि अभिनेता नागा चैतन्य यांचा २०१७ मध्ये प्रेमविवाह झाला होता. परंतू लग्नाच्या पाच वर्षानंतर २०२१ मध्ये या दोघांनी स्वतंत्र होण्याचा निर्णय घेतला होता. दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील या प्रसिद्ध कपलने वेगळे झाल्याने संपूर्ण चाहत्यांनी मोठा धक्का बसला होता.

नागा चैतन्यने घटस्फोट (Divorce)झाल्यानंतर तीन वर्षानंतर नागा चैतन्यने अभिनेत्री शोभिता धुलिपालसोबत साखररपुडा केला आहे. गेल्या काही महिन्यांपासून त्या दोघांमध्ये प्रेम प्रकरण सुरु असल्याची मोठी चर्चा सुरु होती. अखेर नागा चैतन्यने साखरपुडा करत नात्यावर शिक्कामोर्तब केला.

Samantha Ruth Prabhu Relationship Updates
#boycottbollywood : ‘बॉयकॉट बॉलिवूड’ ट्रेंडचा इतिहास थोडक्यात जाणून घ्या ! | Entertainment | Movies

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com