Jailer Actor Arrested Saam Tv
मनोरंजन बातम्या

Jailer Actor Arrested: 'जेलर'च्या अभिनेत्याला अटक, दारूच्या नशेत केलं धक्कादायक कृत्य

Vinayakan Arrested By Keral Police: विनायकनने एर्नाकुलम टाऊन नॉर्थ पोलिस स्टेशनमध्ये मद्यधुंद अवस्थेत गोंधळ घातला.

Priya More

Tollywood Actor Arrested :

रजनीकांत स्टारर 'जेलर' चित्रपटाममध्ये विलनची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्याला पोलिसांनी अटक केली आहे. विनायकन असं या अभिनेत्याचे नाव आहे. त्याने जेलर चित्रपटामध्ये वर्मनची भूमिका साकारली होती. विनायकनने एर्नाकुलम टाऊन नॉर्थ पोलिस स्टेशनमध्ये मद्यधुंद अवस्थेत गोंधळ घातला. त्यामुळे केरळ पोलिसांनी विनायकनला अटक केली आहे.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, विनायकनने त्याच्या अपार्टमेंटमध्ये गोंधळ घातला होता. त्यानंतर पोलिसांनी त्याला पोलिस स्टेशनमध्ये बोलावले होते. पोलिसांनी सांगितल्याप्रमाणे विनायकन पोलिस स्टेशनमध्ये पोहोचला. पण तो दारूच्या नशेत होता. त्याने पोलिस स्टेशमध्ये गोंधळ घालायला सुरूवात केली. त्यानंतर पोलिसांनी अभिनेत्याला अटक केली.

एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, विनायकनला वैद्यकीय तपासणीसाठी जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले. याबाबत अजून कोणतीही माहिती समोर आलेली नाही. विनायकनला रुग्णालयामध्ये नेत असताना त्याने माध्यमांना सांगितले की, 'पोलिसांनी मला का अटक केली माहिती नाही. मी तर तक्रार दाखल करण्यासाठी आलो होतो. तुम्ही पोलिसांना विचारा की ते मला रुग्णालयात का घेऊन जात आहेत?'

अभिनेता विनायकन हा मल्याळम आणि तमिळ चित्रपटांमध्ये काम करतो. तो एक उत्तम डान्सर आणि संगीत संयोजक देखील आहे. रजनीकांत स्टारर 'जेलर' मधील भयानक विलनच्या भूमिकेत त्याला खूप चांगली प्रसिद्धी मिळाली. चित्रपटात विनायकन हुबेहुब रजनीकांत सारखा दिसत होता. या चित्रपटानंतर सर्वत्र विनायकनची चर्चा सुरू झाली. 'जेलर' 10 ऑगस्ट 2023 रोजी रिलीज झाला. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डब्रेक कमाई केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: धाराशिव जिल्ह्यात नगरपरिषद मतदार यादीत घोळ

Pune Police: पुण्यात १७ पोलिस निरीक्षकांच्या बदल्या, कुणाची कुठे झाली बदली? वाचा संपूर्ण लिस्ट

Tridashansh Yog: अवघ्या काही तासांनी गुरु-बुध तयार करणार त्रिदशांश योग; 'या' राशींच्या नशीबी येणार अखेर श्रीमंती

Jalna News: मोठी बातमी! महानगरपालिकेच्या आयुक्तांना १० लाखांची लाच घेताना अटक

Bjp vs Shivsena: दिवाळीआधीच महायुतीत वादाचे फटाके, 'ठाण्यात भाजपचा महापौर होणार' भाजपचा स्वबळाचा नारा

SCROLL FOR NEXT