Salaar 1st Day Box Office Collection Twitter
मनोरंजन बातम्या

Salaar Film 1st Day Collection: प्रभासच्या ‘सालार’ची बॉक्स ऑफिसवर ऐतिहासिक कामगिरी, ‘जवान’चा रेकॉर्ड मोडत पहिल्याच दिवशी केला १०० कोटींचा टप्पा पार

Salaar Film Box Office Collection: प्रभासच्या ‘सालार’ने पहिल्याच दिवशी धमाकेदार ओपनिंग केलेली आहे. नुकतंच सॅकल्निक ट्रेड ॲनालिस्ट कंपनीने चित्रपटाच्या कमाईचा आकडा शेअर केला आहे.

Chetan Bodke

Salaar Film 1st Day Box Office Collection

काल (२२ डिसेंबर) प्रभासचा ‘सालार’ बॉक्स ऑफिसवर रिलीज झाला आहे. प्रभासच्या ‘सालार’ने पहिल्याच दिवशी अनेक चित्रपटांचे रेकॉर्ड मोडित काढत शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. प्रभास ‘आदिपुरुष’नंतर ‘सालार’ चित्रपटामधून प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. ‘आदिपुरुष’ बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला होता. हा चित्रपट फ्लॉप ठरल्यानंतर सर्वांनाच ‘सालार’बद्दल उत्सुकता होती. चित्रपटाने पहिल्याच दिवशी धमाकेदार ओपनिंग केलेली आहे. नुकतंच सॅकल्निक ट्रेड ॲनालिस्ट कंपनीने चित्रपटाच्या कमाईचा आकडा शेअर केला आहे.

रिलीजच्या आधीपासूनच चर्चेत असलेल्या या चित्रपटाने पहिल्याच दिवशी 'जवान', 'पठान', 'गदर २' आणि 'ॲनिमल'चा रेकॉर्ड ब्रेक केला आहे. प्रभाससाठी 'सालार' चित्रपट खूर महत्वाचा ठरला आहे. प्रभास आपल्या अभिनयामुळे प्रचंड ट्रोल होत होता. या चित्रपटाच्या माध्यमातून त्याने सर्वांचीच बोलती बंद केली आहे. प्रभासच्या दमदार अभिनयाने आणि अफलातून ॲक्शनने प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं आहे. प्रशांत नील दिग्दर्शित चित्रपटाची सिनेरसिकांमध्ये चांगलीच क्रेझ पाहायला मिळत आहे.

नुकतंच सॅकल्निक या ट्रेड ॲनालिस्ट कंपनीने चित्रपटाच्या कमाईचा आकडा शेअर केला आहे. सॅकल्निकने दिलेल्या आकड्याप्रमाणे, पहिल्या दिवशी चित्रपटाने तब्बल ११२ कोटींची कमाई केली आहे. आंध्रप्रदेश आणि तेलंगणा राज्यात ७० कोटी, कर्नाटका १२ कोटी, केरळ ५ कोटी, तामिळनाडू ४.५० कोटी तर उर्वरित देशामध्ये २०.५० कोटींची कमाई केली आहे. चित्रपटाने बॉलिवूडमधील सर्वच चित्रपटांच्या कमाईचा आकडा मोडित काढला आहे.

'सालार' चित्रपटाने पहिल्याच दिवशी 'जवान', 'पठान', 'गदर २', 'केजीएफ २' आणि 'ॲनिमल'चा रेकॉर्ड ब्रेक केला आहे. 'सालार'ने पहिल्याच दिवशी ११२ कोटी, 'जवान'ने ६५.५ कोटी, 'पठान'ने ५५ कोटी, 'ॲनिमल'ने ५४.७५ कोटींची तर 'केजीएफ २'ने ५३.५ कोटींची कमाई केली आहे. या सर्वच चित्रपटांची कमाई ब्रेक करत 'सालार' चित्रपटाने ऐतिहासिक कामगिरी केली आहे.

'सालार पार्ट-1 सीझफायर'ची कथा दोन भागांमध्ये विभाजित केली आहे. प्रशांत नील दिग्दर्शित 'सालार पार्ट-1 सीझफायर' ची निर्मिती होंबाळे फिल्सच्या बॅनरखाली केली आहे. २२ डिसेंबरला अर्थात आज चित्रपट रिलीज झाला असून हिंदी, तमिळ, तेलुगू, मल्याळम आणि कन्नड भाषेमध्ये तुम्ही हा चित्रपट पाहू शकता. चित्रपटामध्ये प्रभास, पृथ्वीराज सुकुमारन, श्रृती हासन, बॉबी सिम्हा आणि जगपती बाबू प्रमुख भूमिकेत आहेत. (Entertainment News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vastu Tips: आंघोळ न करता जेवण बनवणं अशुभ असतं?

Maharashtra Live News Update: भाईंदर पश्चिमेकडील जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; १८ जुगारी अटकेत

Pranjal Khewalkar: खराडी ड्रग्स पार्टी प्रकरणाला नवे वळण, फॉरेन्सिक रिपोर्टमध्ये नेमकं काय?

Tejaswini Lonari: नथीचा नखरा अन् नऊवारी साडी...; नवरात्री निमित्तानं तेजस्विनीचा मनमोहक लूक, पाहा PHOTO

EPFO News : PF खातेधारकांसाठी खुशखबर! एटीएममधून मिनिटांत काढता येणार पैसे, 'या' तारखेपासून सुरु होणार सेवा, जाणून घ्या

SCROLL FOR NEXT