प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्री नयनतारा (Nayantara) सध्या 'अन्नपूर्णी' चित्रपटामुळे (Annapoorani Movie) अडचणीत आली आहे. चित्रपटामध्ये हिंदू धर्माच्या भावना भडकवणारी दृश्य आणि विधाने वापरली असल्याचा आरोप करण्यात करण्यात आला होता. या प्रकरणी अभिनेत्री आणि चित्रपटाच्या निर्मात्यांसह सात जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवरून सुद्धा डिलीट करण्यात आला आहे. वाढता वाद पाहता आणि गुन्हा दाखल झाल्यानंतर अभिनेत्रीने सोशल मीडियावर पोस्ट करत माफी मागितली आहे. (Tollywood)
अभिनेत्रीने सोशल मीडियावर शेअर केलेल्या माफीनाम्यात लिहिले की, "मी जड अंतःकरणाने हा माफीनामा लिहित आहे. गेल्या काही दिवसांपासून 'अन्नपूर्णी' चित्रपटाबद्दल जो काही वाद सुरू आहे, त्याबद्दल मी सर्वांची माफी मागते. मी ‘अन्नपूर्णी’ चित्रपट फक्त आर्थिक लाभाच्या हेतूसाठी बनवलेला नाही, आम्हाला या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांसमोर काही सकारात्मक संदेश द्यायचे होते, पण नकळत आमच्याकडून प्रेक्षकांच्या भावना दुखावल्या गेल्या." (Actress)
"थिएटरमध्ये दाखवलेला आणि सेन्सॉर केलेला चित्रपट OTT प्लॅटफॉर्मवरून काढून टाकला जाईल, याची आम्हाला अपेक्षा नव्हती. माझा आणि माझ्या टीमचा केव्हाही कोणाच्याच भावना दुखावण्याचा हेतू नव्हता. आम्हाला या समस्येचे गांभीर्य कळते. देवावर पूर्णपणे विश्वास ठेवणारी आणि देशभरातील मंदिरांमध्ये वारंवार जाणारी मी एक स्त्री असल्याने मलाही त्या गोष्टीची जाणीव आहे." (Social Media)
"ज्यांच्या आमच्याकडून अनावधानाने भावना दुखावल्या गेल्या असतील, त्यांची मी मनापासून माफी मागते. माझ्या दोन दशकांच्या सिनेकारकिर्दिमध्ये, माझे उद्दिष्ट केवळ सकारात्मकता पसरवणे हेच राहिलं आहे." असं लिहित नयनताराने चाहत्यांची माफी मागितली. (Entertainment News)
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.