Main Hoon Atal Twitter Review: पंकज त्रिपाठीचा 'मैं अटल हूं' नेटकऱ्यांना कसा वाटला ?

Main Hoon Atal: रवि जाधव दिग्दर्शित 'मैं अटल हूं' चित्रपट आज (१९ जानेवारी) थिएटरमध्ये रिलीज झाला आहे.
Main Hoon Atal Twitter Review
Main Hoon Atal Twitter ReviewTwitter
Published On

Main Hoon Atal Twitter Review

रवि जाधव (Ravi Jadhav) दिग्दर्शित 'मैं अटल हूं' (Main Atal Hoon) चित्रपट आज (१९ जानेवारी) थिएटरमध्ये रिलीज झाला आहे. चित्रपटामध्ये स्वर्गीय माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयींच्या मुख्य भूमिकेमध्ये पंकज त्रिपाठी आहे. सध्या सोशल मीडियावर चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू आहे. अनेक चित्रपट समीक्षकांसह काही युजर्सनेही हा चित्रपट पाहिला आहे. त्यांनी ट्वीटर (एक्स)वर पोस्ट करत चित्रपटाविषयी पोस्ट शेअर केली आहे.

Main Hoon Atal Twitter Review
Bollywood Upcoming Movie: अटल बिहारींच्या जीवनावर चित्रपट, 'हा' धडाडीचा कलाकार साकारणार पंतप्रधानांची भूमिका

पहिला युजर म्हणतो, 'मैं अटल हूं' चित्रपटामध्ये पंकज त्रिपाठी यांनी स्वर्गीय माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांची भूमिका खूप उत्तम पद्धतीने साकारली आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून अटल बिहारी वाजपेयी यांना खरी श्रद्धांजली वाहिली आहे. चित्रपटाचे कथानक उत्तम पद्धतीने केल्यामुळे चित्रपट खूप सुंदर झाला आहे. या युजरने चित्रपटाला ४ स्टार दिले आहेत.

तर आणखी एक युजरने हा चित्रपट पाहिला आहे. स्वर्गीय माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या जीवनावर आधारित चित्रपट खूप सुंदर आहे. पंकज त्रिपाठी यांनी माजी पंतप्रधानांची भूमिका खूप उत्तम रित्या साकारली आहे. अगदी हुबेहुब अटल बिहारी वाजपेयी यांचे पात्र त्यांनी साकारले. प्रत्येक वयोगटातील माणसानं चित्रपट पाहावा असा हा चित्रपट आहे. यावेळी या युजरने पंतप्रधान नरेंद्र मोदींना टॅग करत टॅक्स फ्री चित्रपट करण्याची मागणी केली.

Main Hoon Atal Twitter Review
Bollywood Upcoming Movie: अटल बिहारींच्या जीवनावर चित्रपट, 'हा' धडाडीचा कलाकार साकारणार पंतप्रधानांची भूमिका

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com