Samantha Ruth Prabhu Saam Tv
मनोरंजन बातम्या

Samantha Prabhu: समांथा प्रभूच्या मित्राने दिले हेल्थ अपडेट, जाणून घ्या तब्येतीविषयीची माहिती...

२०२२ या वर्षात समांथाच्या आयुष्यात फारच बदल झाले, या वर्षात समांथाला एका गंभीर आजाराला सामोरे जावे लागले होते.

Chetan Bodke

Samantha Prabhu: दक्षिण चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेत्री म्हणून ठसा उमटवणाऱ्या समंथा रुथ प्रभूचे 2022 हे वर्ष चांगले गेले नाही. या वर्षात समांथाला एका गंभीर आजाराला सामोरे जावे लागले होते. तेव्हापासून समंथा रुथ प्रभूचे चाहते तिच्या तब्येतीची माहिती जाणून घेण्यसाठी नेहमीच उत्सुक आहेत. नुकतंच या अभिनेत्रीच्या जवळच्या मित्रानेच तिच्या तब्येतीबद्दल खुलासा केला आहे.

'समंथा आता पूर्णपणे बरी झाली आहे आणि आता ती लवकरच आपल्या कामावर रुजु होण्यासाठी लवकरच सज्ज होत आहे. तुम्हाला तिला कॉल करायचा असेल तर तुम्ही करू शकता, पण मी तुम्हाला सांगू इच्छिते की ती कुठेही बाहेर गेली नाही. घटस्फोटोनंतर समंथाला बराच संघर्ष करावा लागल्याचे माध्यमांनी दाखवले होते, पण असं काही नाही. समंथा नुकतीच एका आजाराशी लढा देत आहे आणि आता ती पूर्णपणे बरी आहे.' समांथाच्या मित्राने एका इंग्रजी संकेतस्थळाला तिच्या प्रकृतीविषयी ही माहिती दिली आहे.

तिच्या कामासंबंधित बोलायचे तर, समांथा रुथ प्रभू संपूर्ण पणे बरी होताच, सर्वप्रथम विजय देवरकोंडासोबत मुख्य भूमिकेत असलेल्या चित्रपटाची शूटिंग संपवणार आहे. त्यानंतर, अॅमेझॉन प्राइम व्हिडिओवरील एका चित्रपटासाठी शूटिंग करणार आहे. याशिवाय अभिनेत्रीकडे अन्य काही अनेक प्रोजेक्ट्स देखील आहेत, त्या माध्यमातून ती पुन्हा एकदा दमदार पुन:रागमन करणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना ₹१५०० की ₹३००० रुपये मिळणार? सप्टेंबर-ऑक्टोबर हप्त्याबाबत राज्य सरकारचा उद्या घेणार मोठा निर्णय

भाजपमध्ये ५० वर्षांपासून असणाऱ्या दिग्गज नेत्याचा तडकाफडकी राजीनामा; राजकारणात खळबळ

E100 Ethanol : आता वाहन चालवण्यासाठी पेट्रोल, डिझेल आणि CNG ची गरज नाही; इंधनाबाबत केंद्र सरकारनं घेतला मोठा निर्णय

Maharashtra News Live Update: भांडुप रेल्वे स्थानकात AC लोकलच्या धडकेमुळे तरुणाचा मृत्यू

३० दिवस कॉफीऐवजी ग्रीन टी प्यायलात तर काय होतं? रिझल्ट एकदम जबरा

SCROLL FOR NEXT