भाजपमध्ये ५० वर्षांपासून असणाऱ्या दिग्गज नेत्याचा तडकाफडकी राजीनामा; राजकारणात खळबळ

Rajasthan BJP Faces Setback: भाजपला मोठा धक्का बसला असून जनसंघाच्या काळापासून पक्षाशी जोडलेले ज्येष्ठ नेते चिरंजीलाल टांक यांनी ५० वर्षांनंतर भाजप सदस्यत्वाचा राजीनामा दिला.
Chiranjilal Tank alleges neglect by BJP leaders for 10 to 12 years
Chiranjilal Tank alleges neglect by BJP leaders for 10 to 12 yearssaam tv
Published On: 

भाजपच्या विचारधारेशी जनसंघाच्या काळापासून जोडलेले असलेले ज्येष्ठ नेते, माजी पंचायत समिती प्रधान आणि लसानी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच चिरंजीलाल टांक यांनी तब्बल पाच दशकांच्या राजकीय प्रवासानंतर भाजपच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी आपला राजीनामा भाजपचे राजसमंद जिल्हाध्यक्ष जगदीशचंद्र पालीवाल यांच्याकडे पाठवला आहे. गेल्या 10 ते 12 वर्षांपासून संघटना आणि सत्तेतील नेत्यांकडून सातत्याने दुर्लक्ष होत असल्याचा आरोप त्यांनी राजीनाम्यात केला आहे.

Chiranjilal Tank alleges neglect by BJP leaders for 10 to 12 years
प्रवाशांचे टेन्शन झालं दूर! टोल नाक्यांवर मिळणार स्वच्छ टॉयलेट अन् पार्किंग सुविधा, NHAI कडून मार्गदर्शक सूचना जारी

चिरंजीलाल टांक यांच्या म्हणण्यानुसार, ते गेल्या ५० वर्षांपासून भाजपचे निष्ठावान कार्यकर्ते म्हणून सक्रिय आहेत. त्यांनी १९९५ ते २००० या काळात लसानीचे सरपंच, २००० ते २००३ या काळात भाजपचे संयुक्त देवगड मंडळाध्यक्ष, तर २००५ ते २०१० या काळात देवगड पंचायत समितीचे प्रधान म्हणून काम केले. या काळात त्यांनी परिसरात पक्षाची संघटनात्मक ताकद वाढवण्यासाठी योगदान दिले.

Chiranjilal Tank alleges neglect by BJP leaders for 10 to 12 years
राहुल गांधी यांची मानहानी प्रकरणात निर्दोष मुक्तता; काँग्रेस कार्यकर्त्यांचा जल्लोष

चिरंजीलाल टांक यांनी स्थानिक नेतृत्व आणि पक्षातील काही नव्या कार्यकर्त्यांकडून वारंवार आपल्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचवला जात असल्याचा आरोप केला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, पाच ते सात दिवसांपूर्वी सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडीओमध्ये त्यांच्यासाठी 'गद्दार' आणि 'दारुडा' यांसारख्या अपमानास्पद शब्दांचा वापर करण्यात आला होता. तसेच, त्यांना पक्षातून बाहेर काढण्याबाबत किंवा त्यांनी राजीनामा देण्याबाबतही वक्तव्ये करण्यात आल्याचा दावा त्यांनी केला.

Chiranjilal Tank alleges neglect by BJP leaders for 10 to 12 years
Maharashtra SIR : महाराष्ट्र सरकार अन् आयोगाला सुप्रीम कोर्टाची नोटीस, नेमका काय आहे याचिकाकर्त्यांचा दावा?

या प्रकारामुळे आपला सार्वजनिक अपमान झाल्याची भावना व्यक्त करत टांक यांनी २४ ऑक्टोबर रोजी जड अंतःकरणाने पक्षाच्या सक्रिय सदस्यत्वाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला. आपल्या राजीनामापत्रात चिरंजीलाल टांक यांनी पंजाबचे राज्यपाल गुलाबचंद कटारिया, दिवंगत हरिओम सिंह राठोड, दिवंगत किरण माहेश्वरी तसेच नंदलाल सिंघवी, बंसीलाल खटीक आणि मांधाता सिंह यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्यांच्या सहवासाची आणि मार्गदर्शनाची आठवण करून दिली आहे. त्यांच्या राजीनामापत्राची प्रत जयपूर येथील भाजपच्या प्रदेश कार्यालयालाही पाठवण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com