Tollywood Actress Rashi Singh Saam
मनोरंजन बातम्या

'शिक्षक फक्त माझे गुरू नसून, Boyfriendही होते', वेबसिरीजच्या प्रोमोशनवेळी अभिनेत्रीकडून खुलासा

Tollywood Actress Rashi Singh: टॉलिवूड अभिनेत्री राशी सिंग सध्या सोशल मीडियात तुफान चर्चेत येत आहे. तिनं अलिकडेच प्रोमोशनदरम्यान, रिलेशनशिपबाबत मोठा खुलासा केला आहे.

Bhagyashree Kamble

तेलुगू सिनेविश्वात सध्या अभिनेत्री राशी सिंग प्रचंड चर्चेत आहे. तिचा आगामी '३ रोझेस सिझन २' ही वेबसिरीज लवकरच ओटीटीवर रिलीज होणार आहे. या वेबसिरीजची सध्या चर्चा होत आहे. या वेबसिरीजची कास्ट प्रोमोशन आणि मुलाखतींमध्ये व्यस्त आहेत. या वेबसिरीजच्या प्रोमोशनदरम्यान, राशी सिंगने आपल्या वैयक्तिक आयुष्याबाबत मोठा गौप्यस्फोट केला. तिनं रिलेशनशिपबाबत माहिती दिली. दरम्यान, तिला तिच्या प्रियकरावरून ट्रोल केलं जात आहे.

या वर्षी राशी सिंग २ चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीस आली होती. ब्लाइंड स्पॉट आणि पाच मिनार या २ चित्रपटातून तिनं आपली उत्तम कामगिरी सादर केली. मात्र, हे दोन्ही चित्रपट फ्लॉप ठरले. या दोन्ही चित्रपटांना प्रेक्षकांकडून फारसा प्रतिसाद मिळाला नाही. ती लवकरच '३ रोझेस सिझन २'या वेबसिरीजमधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

या वेबसिरीजच्या प्रोमोशनदरम्यान, तिनं आपल्या प्रेमकथेबद्दल सांगितले. शाळा सोडल्यानंतर इंटरमीडिएटमध्ये शिकत असताना तिला शिक्षक आवडला असल्याचा खुलासा केला. तिनं वैयक्तिक म्हणजेच रिलेशनबाबत केलेल्या खुलाशानंतर चर्चेला उधाण आलं आहे.

राशी सिंगनं सांगितलं की, 'ती व्यक्ती फक्त माझी आवडती टीचर नव्हती, तर कालांतरने माझे प्रियकर देखील झाले. मी तेव्हा १७ वर्षांची असेन. मला परिक्षेपूर्वी प्रश्नपत्रिका द्यायचे. तोंडी परिक्षेदरम्यान, सोपे प्रश्न विचारायचे. एक्झामपूर्वी माझ्यासोबत बोलायचे. यामुळे माझा काहीसा ताण कमी व्हायचा. त्यावेळी त्यांचे लग्न झाले नव्हते', अशी माहिती राशीनं दिली.

राशीनं आपल्या प्रियकराबाबत माहिती देत सांगितलं की, 'आता ते विवाहित आहेत. परंतु अजूनही ते मला समाजमाध्यमांवर फॉलो करतात',अशी माहितीही राशीनं दिली. राशी सिंगनं रिलेशनशिपबाबत माहिती दिल्यानंतर समाजमाध्यमांमध्ये चर्चेला उधाण आलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Politics: मुंबईत भाजपनंतर शिंदेसेनेला मोठं खिंडार, बड्या नेत्यांसह पदाधिकाऱ्यांचे तडकाफडकी राजीनामे

Maharashtra Live News Update: पुण्यातील नाराज भाजप खासदार मेधा कुलकर्णी यांची पोस्ट चर्चेत

Glowing Face Pack: चेहरा ग्लोईंग आणि सॉफ्ट पाहिजे? मग, घरच्या या सामग्रीने बनवा खास फेसपॅक, तीन दिवसात दिसेल फरक

मतदानाआधीच भाजपच्या खात्यात ४ था विजय, कार्यकर्त्यांनी उधळला गुलाल|VIDEO

Hair Care: लांब घनदाट आणि शाईनी केस पाहिजेत? मग आजीने सांगितलेला हा नुस्खा नक्की करा ट्राय

SCROLL FOR NEXT