Timepass 3 Marathi Movie
Timepass 3 Marathi Movie Saam TV
मनोरंजन बातम्या

Timepass 3: अजून काय पाहिजे? कॉमेडी, मनोरंजनाचा तडका असलेला 'टाइमपास ३' ओटीटीवर

Nandkumar Joshi

मुंबई: झी स्टुडिओज निर्मित 'टाइमपास ३' चित्रपट २९ जुलै रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. चित्रपटात (Marathi Movie) मुख्य भूमिकेत हृता दुर्गुळे, प्रथमेश परब, भाऊ कदम, वैभव मांगले, संजय नार्वेकर यांच्यासह इत्यादी कलाकारही मुख्य भूमिकेत होते. येत्या १६ सप्टेंबर रोजी 'Zee5' या ओटीटी प्लॅटफॉर्मवर (Over The Top Platform) 'टाइमपास ३' झळकणार आहे. 'पांडू', 'झोंबिवली' आणि 'धर्मवीर'च्या ओटीटीच्या यशस्वी प्रिमियरनंतर 'टाइमपास ३' ओटीटीवर प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे. (Timepass 3 Movie On Zee5)

हे देखील पाहा -

चित्रपटाने नुकतेच पार पडलेल्या 'झी कॉमेडी अवॉर्ड्स' मध्ये अनेक पुरस्कारांवर नाव कोरले आहेत. यात अनुक्रमे सर्वोत्कृष्ट चित्रपट, सर्वोत्कृष्ट लेखक- प्रियदर्शन जाधव आणि रवी जाधव तर सर्वोत्कृष्ट कलाकार- हृता दुर्गुळेने पुरस्कारावर आपले नाव कोरले. रवी जाधव दिग्दर्शित 'टाइमपास'च्या पहिल्या भागात दगडू व प्राजक्ता या दोन शाळकरी वयातील मुलांची प्रेमकहाणी दाखविण्यात आली असून प्रथमेश परब आणि केतकी माटेगावकर यांनी या व्यक्तिरेखा साकारल्या होत्या. 'टाइमपास २' चे कथानक १५ वर्षांनी घडते असे दाखवले होते. चित्रपटामध्ये प्रियदर्शन जाधव आणि प्रिया बापट यांच्या प्रमुख भूमिका होत्या.

चित्रपटाच्या तिसऱ्या भागात ही कथा पुन्हा एकदा दगडूकडे वळते, जी व्यक्तिरेखा पुन्हा एकदा प्रथमेश परबनेच साकारली आहे. यावेळी दगडूने त्याची बारावीची परीक्षा ३६ टक्के गुण मिळवून उत्तीर्ण केली असून आता तो कॉलेजमध्ये जाणार आहे. दगडूला त्याचे गुंडगिरीचे दिवस विसरून नवी सुरुवात करायची आहे. पण त्याच्या या प्रवासात अनेक जण त्याची वारंवार परीक्षा घेत असतात. कारण त्यांच्या मते दगडू बदलणे शक्यच नाही. त्याला आपली ही नवी प्रतिमा कायम ठेवणे गरजेचे असते. कारण तो आता त्याच्या वर्गात असलेल्या पालवीच्या प्रेमात पडला आहे.

पालवी एका गँगस्टरची मुलगी आहे. दगडूच्या ‘जंटलमन’ प्रतिमेची पालवीला भुरळ पडली आहे. पण कोणत्याही चांगल्या गोष्टींचा कधी ना कधी शेवट होतो, तसे दगडूने पांघरलेली ही झूलही उतरते. असे झाल्यावर दगडू-पालवीच्या नात्यावर काही परिणाम होतो का, हे या चित्रपटात उलगडणार आहे.

'टाइमपास ३' या चित्रपटाला IMDB वर ७.३ इतके मानांकन मिळाले आहे. प्रेक्षकांसाठी मनोरंजनाने परिपूर्ण असलेल्या 'टाइमपास ३' चित्रपटात विनोद व रोमान्स भरपूर आहे. अथांश कम्युनिकेशन आणि झी स्टुडियोजची निर्मिती असलेल्या या चित्रपटाचा १६ सप्टेंबर रोजी 'Zee5' वर प्रीमिअर होणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sanjay Raut News | फडणवीसांना शिंदे मुख्यमंत्री म्हणून नको होते? राऊतांचा मोठा दावा!

Bank Holiday: मतदानामुळे उद्या देशातील 49 शहरात बँका राहणार बंद, महाराष्ट्रातील शहरांची पाहा लिस्ट

Akola News : पाण्यासाठी शोले स्टाईल आंदोलन; उपसपंचासह सदस्यांचे अकोटमध्ये आंदोलन

Loksabha Election 2024: 'शतकवीर' जयंत पाटील! पायाला भिंगरी बांधून महाराष्ट्र पिंजून काढला; प्रचारसभांचा केला अनोखा विक्रम |VIDEO

Health Tips: ३० मिनिटांपेक्षा जास्त मोबाईलवर बोलताय? होऊ शकतात 'हे' गंभीर आजार

SCROLL FOR NEXT