Megha Thakur Death News/Instagram SAAM TV
मनोरंजन बातम्या

Megha Thakur: टिकटॉक स्टार मेघा ठाकूरचे निधन; अवघ्या 21 व्या वर्षी घेतला जगाचा निरोप

पॉझिटिव्हिटी आणि कॉन्फिडन्स वाढवायचा कसा हे व्हिडिओद्वारे सांगून घराघरात पोहोचलेली सोशल मीडिया इन्फ्युएन्सर आणि टिकटॉक स्टार मेघा ठाकूरचं निधन झालं.

साम ब्युरो

Tik Tok Star Megha Thakur Dies : पॉझिटिव्हिटी आणि कॉन्फिडन्स वाढवायचा कसा हे व्हिडिओद्वारे सांगून घराघरात पोहोचलेली सोशल मीडिया इन्फ्युएन्सर आणि टिकटॉक स्टार मेघा ठाकूरचं निधन झालं. अवघ्या २१ व्या वर्षी तिनं या जगाचा निरोप घेतला. मेघा ही सोशल मीडियावर सकारात्मकता आणि आत्मविश्वास वाढवण्याच्या सोप्या टिप्स व्हिडिओद्वारे देत असे.

मेघा ठाकूर ही अल्पावधीतच प्रसिद्ध झाली होती. इंडो-कॅनडीयन टिकटॉक स्टार मेघा ठाकूर हिचे सोशल मीडियावर लाखो फॉलोअर्स होते. तिच्या मृत्यूनं चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. नृत्यकौशल्य आणि सकारात्मकतेचे व्हिडिओ ती सोशल मीडियावर पोस्ट करत असे. मेघा ठाकूरच्या वडिलांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून मेघाच्या निधनाचे वृत्त दिले. (Social Media)

मेघाच्या वडिलांची दुःखद पोस्ट

मेघाच्या वडिलांनी इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. जड अंतःकरणानं आमच्या आयुष्यातील प्रकाश असलेली, दयाळू आणि आमची काळजी घेणारी मुलगी मेघा ठाकूर हिचं २४ नोव्हेंबर २०२२ रोजी आकस्मिक निधन झालं आहे, असं तिच्या वडिलांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे. (Latest Marathi News)

पॉझिटिव्हिटी आणि कॉन्फिडन्स वाढवण्याच्या टिप्स शेअर करायची

मेघा ठाकूर अवघ्या २१ वर्षांची होती. पण सोशल मीडियावर ती चाहत्यांना पॉझिटिव्हिटी आणि कॉन्फिडन्स कसा वाढवायचा याच्या टिप्स व्हिडिओद्वारे द्यायची. मेघा ही मूळची मध्य प्रदेशातल्या इंदूरची होती. तिचा जन्म २००१ साली झाला होता. मेघा एका वर्षाची असताना तिचे आईवडील कॅनडामध्ये वास्तव्यासाठी गेले. मेघाचं शिक्षणही तिथंच झालं. ती कॅनडाच्या ओंटारियोमधील ब्रॅम्पटनमध्ये राहत होती.

सोशल मीडिया स्टार होती मेघा ठाकूर

मेघा सोशल मीडिया इन्फ्ल्युएन्सर होती. खूप कमी वयात ती स्टार झाली होती. तिचे टिकटॉकवर जवळपास १ मिलियन फॉलोअर्स होते. ती इन्स्टाग्राम आणि ट्विटरवरही व्हिडिओ शेअर करायची. ट्विटरवर तिचे ९३ हजार फॉलोअर्स, तर इन्स्टाग्रामवर लाखो फॉलोअर्स होते. मेघाचा शेवटचा व्हिडिओ तिनं चार महिन्यांपूर्वी शेअर केला होता. मेघाचा मृत्यू कशामुळं झाला याबाबतची माहिती समोर आलेली नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

White Clothes: अंत्यसंस्कारावेळी पांढरे कपडे का घालतात? कारण वाचून व्हाल आश्चर्यचकीत

डोनाल्ड ट्रम्प यांना बसला टॅरिफचा 'डंक'; सहा देशांकडून F-35 लढाऊ विमानांचा करार रद्द

ऐन निवडणुकीत गोळीबार, कुख्यात गुन्हेगाराची गोळ्या झाडून हत्या, परिसरात खळबळ

Ashish Deshmukh: 'जास्त कराल तर कापून काढू'; आमदार आशिष देशमुखांची विरोधकांना धमकी

दुसरं लग्न थेट गुन्हा ठरणार; तब्बल १० वर्षांचा तुरुंगवास भोगावा लागणार

SCROLL FOR NEXT