Filed charged against Tiger Shroff and Disha Patni 
मनोरंजन बातम्या

Tiger Shroff New Girlfriend : टायगर श्रॉफ आता 'या' मॅाडेलच्या प्रेमात, एक्स गर्लफ्रेंड दिशा पटानी समोर दिसते पानी कम चाय!

बॅालिवूडची फिटनेस क्वीन दिशा पाटनी आणि अॅक्शन हिरो टायगर श्रॅाफ गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या ब्रेकअपच्या चर्चांमुळे प्रकाशझोतात आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Tiger Shroff New Girlfriend | मुंबई : बॅालिवूडची फिटनेस क्वीन दिशा पाटनी (Disha patani) आणि अॅक्शन हिरो टायगर श्रॅाफ(Tiger Shroff) गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या ब्रेकअपच्या चर्चांमुळे प्रकाशझोतात आहेत. मागील सहा वर्षांपासून दोघे एकमेकांना डेट करत होते. अलीकडेच दोघेही वेगळे झाल्याचा चर्चांना वेग आला असून, टायगर श्रॅाफ मॅाडेल आकांक्षा शर्माला डेट करत असल्याचं बोलले जात आहे. आता याबाबतच्या वृत्तांवर स्वतः टायगरने खुलासा केला आहे.

एका मुलाखती दरम्यान, टायगरला त्याच्या रिलेशनशिप स्टेट्सबद्दल विचारले असता, त्याने आकांक्षा शर्माला डेट करत असल्याच्या बातम्या निव्वळ अफवा असल्याचं स्पष्ट केलं आहे. पुढे दिशाबद्दल विचारले असता, पुन्हा एकदा दिशाबद्दल काहीही सांगण्यास नकार दिला आहे.

टायगर आणि आकांक्षा शर्मा या दोघांनी म्युझिक व्हिडीओमध्ये एकत्र काम केले आहे. 'आय एम अ डिस्को डान्सर २.०' २०२० च्या फेमस व्हिडीओ म्युझिकमध्ये टायगर श्रॉफ आकांक्षा यांची ओळख झाली. यानंतर 'कॅसेनोवा' या म्युझिक व्हिडीओमध्ये पुन्हा एकदा दोघे एकत्र दिसून आले. आकांक्षा शर्माने तिच्या करिअरची सुरुवात मॉडेल म्हणून केली. २०२० मध्ये साऊथ 'त्रिविक्रम' चित्रपटातून आकांक्षाने अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. अनेक जाहिरातींमध्ये आकांक्षाने वरूण धवन आणि महेश बाबू यांसारख्या अभिनेत्यांसोबत काम केले आहे.

टायगर श्रॅाफ आणि दिशा पटानी मागील अनेक वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते. परंतु कधीही दोघांनी त्यांच्या नात्याबद्दल अधिकृतपणे घोषणा केली नसली, तरी अनेकदा दोघे एकत्र दिसले आहेत. अलीकडेच दिशा टायगरसोबत लग्न करण्याच्या तयारीत होती. मात्र टायगरने लग्नाला नकार दिला असून सध्या टायगरने त्याच्या करिअरवर लक्ष केंद्रित केले आहे. यामुळेच दोघे वेगळे झाले असल्याचे बोलले जात आहे. नुकताच प्रदर्शित झालेल्या दिशाच्या 'एक व्हिलन रिटर्न्स' या चित्रपटासाठी सोशल मीडियावर टायगर श्रॅाफने दिशाचे कौतुक केले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Manoj Jarange Patil: विधानसभेसाठी मनोज जरांगेंचा फुलप्रुफ प्लॅन, मविआला बसणार फटका? वाचा स्पेशल रिपोर्ट

Sharad Pawar: निवडणूक आयोगाचा शरद पवार गटाला मोठा दिलासा; Trumpet च्या चिन्हाचं भाषांत्तर 'ट्रम्पेट' च

Prakash Ambedkar: निवडणुकीच्या रणधुमाळीत प्रकाश आंबेडकरांची प्रकृती खालवली; रक्तात आढळली गाठ

Adulterated Sweets: ऐन सणासुदीत भेसळीचा काळाबाजार; बाजारात विकला जातोय नकली खवा?

Maharashtra News Live Updates: कल्याण पश्चिम विधानसभेतील शिवसेना शिंदे गटाचे बंडखाेर उमेदवार अरविंद मोरे यांची माघार

SCROLL FOR NEXT