Chetan Vadnere Bought New Home 
मनोरंजन बातम्या

Chetan Vadnere : स्टायलिश किचन अन् हटके इंटिरियर... 'ठिपक्यांची रांगोळी' फेम अभिनेत्याने घेतलं नवीन घर, पाहा VIDEO

Chetan Vadnere Bought New Home : 'ठिपक्यांची रांगोळी' फेम अभिनेत्याने व्हिडिओ शेअर करत घराची झलक दाखवली आहे. अभिनेत्याने नवं घर मुंबईमध्ये वैगेरे नाही तर, नाशिकमध्ये घर खरेदी केले आहे.

Chetan Bodke

२०२३ प्रमाणेच २०२४ मध्येही अनेक सेलिब्रिटींनी नवीन घर खरेदी करत आपलं ड्रीम पूर्ण केले आहे. गेल्या काही दिवसांपूर्वीच रुपाली भोसले, रोहित माने, शिवाली परब, पृथ्वीक प्रताप, धनश्री काडगांवकर यांनी मुंबईमध्ये घर खरेदी करत आपलं स्वप्न पूर्ण केले आहे. अशातच आता आणखी एका मराठमोळ्या टीव्ही अभिनेत्याने नवीन घर खरेदी केले आहे. पण अभिनेत्याने हे नवं घर मुंबईमध्ये वैगेरे नाही तर, नाशिकमध्ये घर खरेदी केले आहे. 'ठिपक्यांची रांगोळी' फेम चेतन वडनेरे ह्याने व्हिडिओ शेअर करत घराची झलक दाखवली आहे.

'ठिपक्यांची रांगोळी' मालिकेतून प्रकाशझोतात आलेल्या चेतनने आपल्या अभिनयामुळे प्रसिद्धी मिळवली आहे. सध्या अभिनेता त्याच्या पर्सनल लाईफमुळे चर्चेत आला आहे. अभिनेत्याने नाशिकमध्ये नवीन घर खरेदी केले आहे. काही तासांपूर्वी अभिनेत्याने इन्स्टाग्रामवर घराची व्हिडिओ शेअर केलेली आहे. या व्हिडिओमध्ये त्याने घराचे काम सुरू असतानाचा व्हिडिओ आणि घर तयार झाल्यानंतरचा व्हिडिओ शेअर केलेला आहे. अभिनेत्याच्या घरातील इंटिरियरने सर्वांचेच लक्ष वेधले आहे. त्याच्या घराचं इंटिरियर अगदी पाहण्यासारखं आहे.

हॉल, दोन मोठ मोठे प्रशस्त बेडरुम आणि स्टायलिश किचन, डायनिंग एरिया असं स्ट्रक्चर व्हिडिओमध्ये दिसत आहे. हॉलला जोडून छान गॅलरी आहे जिथे झोका लावला आहे आणि कुंड्या ठेवल्या आहेत. भिंतीवर वारली पेंटिंग केलं आहे. एकूणच अतिशय सुंदर असं घराचं डिझाईन आहे. शिवाय नंबर प्लेटनेही प्रेक्षकांचे लक्ष वेधले आहे. त्यावर 'वडनेरे' असं नाव लिहिलं असून त्यावर फुलांची डिझाईन दिसत आहे. 'घर हे माझे आनंदाचे, नाशिकचं नवीन घर' असं कॅप्शन देत अभिनेत्याने घराची झलक शेअर केली आहे.

चेतनने एप्रिल महिन्यात ऋतुजा धारपसोबत लग्न करत आयुष्यातील नव्या इनिंगला सुरुवात केली होती. अभिनेत्याने लग्नाच्या अवघ्या तीन महिन्यांतच घर घेतल्याची गुड न्यूज फॅमिलीला, फॅन्सला आणि फ्रेंड्सला दिलेली आहे. चेतनला चाहत्यांसह मराठी सिनेविश्वातील अनेक कलाकारांनी नवं घर घेतल्याबद्दल शुभेच्छा दिलेल्या आहेत. त्याशिवाय, यावेळी चेतन बिग बॉसच्या घरात प्रवेश करणार असल्याची चर्चाही रंगली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Toxic: यशच्या 'टॉक्सिक'ला बकवास म्हणणं प्रसिद्ध यूट्यूबरला पडलं महागात; थेट मिळाली कायदेशीर नोटीस

Fact Check : आधार कार्ड दाखवून ३ लाखांचे कर्ज, सरकारच्या अधिकृत स्पष्टीकरणाने उडाली खळबळ

Maharashtra News Live Update: एमपीएससी पेपर फुटी प्रकरणात मुंबई पोलिसांकडनं तपासाला गती

Gold Rate Today: रक्षाबंधनाला सोनं खरेदीची सुवर्णसंधी, 10 तोळा सोनं 31600 रुपयांनी स्वस्त; वाचा 18k- 22k आणि 24k चे दर

EPFO Update : नोकरी करणाऱ्या पती-पत्नींसाठी महत्त्वाची बातमी! लग्नानंतर EPFO खात्या संबंधित 'हे' एक काम करायला विसरलात? नंतर होईल गोंधळ

SCROLL FOR NEXT