The Walking Dead Actress Kelley Mack Death  X
मनोरंजन बातम्या

Actress Death : लोकप्रिय अभिनेत्रीचे निधन, अवघ्या ३३ व्या वर्षी जगाला निरोप; मनोरंजन विश्वावर शोककळा

The Walking Dead Actress Death : अमेरिकन अभिनेत्री केली मॅक हीच्या निधनाची बातमी समोर आली आहे. मागच्या महिन्यात तिने ३३ वा वाढदिवस साजरा केला होता. केली मॅकला ग्लिओमा आजार होता.

Yash Shirke

  • द वॉकिंग डेड फेम अभिनेत्री केली मॅकचे निधन

  • वयाच्या ३३ व्या वर्षी घेतला शेवटचा श्वास

  • केलीच्या निधनामुळे मनोरंजनविश्वात हळहळ

Actress : मनोरंजन विश्वातून एक दु:खद बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेत्री केली मॅक हीचे निधन झाले आहे. अवघ्या ३३ व्या वर्षी तिची प्राणज्योत मावळली. 'द वॉकिंग डेड' आणि 'शिकागो मेड' अशा शोजमध्ये काम करुन तिने प्रेक्षकांमध्ये लोकप्रियता मिळवली होती. केली मॅकच्या निधनाच्या बातमीने सिनेसृष्टीमध्ये शोककळा पसरली आहे.

२ ऑगस्ट २०२५ (शनिवारी) केली मॅकचे निधन झाले. केलीने तिच्या जन्मगावी सिनसिनाटी या ठिकाणी अखेरचा श्वास घेतला. केलीच्या निधनाची माहिती तिच्या बहिणीने सोशल मीडिया पोस्टद्वारे दिली आहे. १० जुलै १९९२ रोजी केली मॅकचा जन्म झाला होता. मागच्या महिन्यात केलीने तिचा ३३ वा वाढदिवस साजरा केला होता.

डेडलाइन वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार, केली मॅक ग्लिओमा आजाराने त्रासली होती. ग्लिओमा हा एका प्रकारचा ब्रेन ट्यूमर आहे. या आजारात मेंदू आणि पाठीच्या कण्यातील ग्लिअल पेशींमध्ये ट्यूमर होतो. ग्लिअर पेशी न्यूरॉन्सना आधार देतात, त्यांचे पोषण करतात आणि त्यांची काळजी घेतात.

अभिनयाशिवाय केली मॅक एक उत्कृष्ट पटकथालेखिका देखील होती. केलीने तिची आई क्रिस्टन क्लेबेनो यांच्यासोबत काम केले होते. त्यांनी एकत्रितपणे अनेक पटकथा लिहिल्या आहेत. 'ऑन द ब्लॅक' ही १९५० च्या दशकातील लोकप्रिय कथेवर त्यांनी पटकथा लिहिली होती. केलीच्या निधनानच्या बातमीने चाहत्यांना धक्का बसला आहे. सोशल मीडियावर चाहत्यांनी केलीला श्रद्धांजली वाहिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bank Rules : बँक खात्यात ठेवावे लागणार 50 हजार रुपये? काय आहे नवा नियम? VIDEO

Mumbai Metro7A: ट्रॉफिकचं नो टेन्शन; दहिसर ते एअरपोर्ट फक्त ५० मिनिटात पोहोचा, जाणून घ्या Metro 7चा मार्ग, तिकीट दर अन् थांबे

रिक्षाचालकांची तुफान हाणामारी, VIDEO व्हायरल झाल्यानंतर खळबळ

Shocking : मुंबईचा तरुण लातुरात आला, लाईव्ह येऊन सगळं सांगितलं; नंतर अचानक आयुष्य संपवलं

Sunday Horoscope : संडे ४ राशींसाठी ठरणार धोक्याचा? जाणून घ्यायचं असेल तर वाचा राशीभविष्य

SCROLL FOR NEXT