Amruta Khanvilkar : अमृताने पटकावला पहिला राज्य चित्रपट पुरस्कार,'चंद्रमुखी'चं सर्वत्र होतंय कौतुक

Maharashtra State Film Awards : मराठमोळी अभिनेत्री अमृता खानविलकरला 'महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कार' सोहळ्यात सन्मानित करण्यात आले आहे. तिला उत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
Maharashtra State Film Awards
Amruta KhanvilkarSAAM TV
Published On
Summary

'महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कार' सोहळा मुंबईत पार पडला.

सिनेसृष्टीतील अनेक कलाकारांचा पुरस्कार सोहळ्यात सन्मान करण्यात आला.

मराठमोळी अभिनेत्री अमृता खानविलकरला उत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

मराठमोळी अभिनेत्री अमृता खानविलकर (Amruta Khanvilkar) कायम आपल्या नृत्याने चाहत्यांना घायाळ करते. काल (5 ऑगस्टला) 'महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कार' (Maharashtra State Film Awards) सोहळा मोठ्या थाटामाटात मुंबईत पार पडला. या सोहळ्यात हिंदी आणि मराठी सिनेसृष्टीतील अनेक कलाकारांना सन्मानित करण्यात आले आहे. या पुरस्कार सोहळ्यात अमृता खानविलकरला देखील पुरस्काराने गौरवण्यात आले.

अमृता खानविलकरला 'महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कार' सोहळ्यात 'चंद्रमुखी' या मराठी चित्रपटासाठी उत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. पुरस्कार सोहळ्याला अमृता खानविलकर उपस्थित राहिली नव्हती. त्यामुळे तिचा पुरस्कार अभिनेता प्रसाद ओक याने स्वीकारला. अमृताने यासंबंधित एक खास स्टोरी इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे.

अमृता खानविलकरने इन्स्टाग्रामच्या स्टोरीला 'महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कार' सोहळ्याचा व्हिडीओ टाकून लिहिलं की, "माझा पहिला महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कार...उत्कृष्ट अभिनेत्री...'चंद्रमुखी'..." सध्या अमृता खानविलकरवर चाहते आणि कलाकार मंडळींकडून कौतुकाचा आणि प्रेमाचा वर्षाव होत आहे. अमृता खानविलकर सध्या भारतात नसून परदेशात गेली आहे. त्यामुळे ती पुरस्कार सोहळ्याला उपस्थित नव्हती. 'चंद्रमुखी' चित्रपटातील अमृता खानविलकरचा अभिनय चाहत्यांना खूपच आवडला. चित्रपटातील गाणी सुपरहिट ठरली. चाहते अमृता खानविलकरच्या आगामी प्रोजेक्टची आतुरतेने वाट पाहत आहेत. अमृता खानविलकरने मिळालेल्या पुरस्काराबद्दल परदेशातून आभार मानले आहे.

अमृता म्हणते "आज माझ्यासाठी माझ्या महाराष्ट्र राज्याने मला दिलेला मान खूप खास आहे. 'चंद्रमुखी 'साठी आम्ही सगळ्यांनी एक टीम म्हणून काम केले. अगदी दिग्दर्शका पासून ते स्पॉट बॉयपर्यंत सर्वांनी घेतलेली मेहनत ही कायम सार्थकी लागली आहे. प्रेक्षकांनी चित्रपटाला दिलेले प्रेम हे आजही दिसून येते. महाराष्ट्र राज्य पुरस्काराने सन्मानित होणे.. हा क्षण मी माझ्या आयुष्यात कधीच विसरणार नाही. हा माझा पहिला राज्य पुरस्कार आहे.

मला आता फक्त दर्जेदार काम करत राहायचं आहे. चांगल्या लोकांबरोबर काम करायचे आणि आपली कलाकृती प्रेक्षकांपर्यंत पोहचवायची आहे. या निमित्ताने संपूर्ण महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कार टीमचे मी खूप आभार मानते. त्यांनी हा क्षण माझ्या आयुष्यात आणला, माझ्या कामाचे कौतुक करून हा खास पुरस्कार मला दिला. मी या प्रेमाबद्दल कायम ऋणी राहील खूप खूप धन्यवाद"

Maharashtra State Film Awards
Tharala Tar Mag : 'ठरलं तर मग'मध्ये मोठा ट्विस्ट; सायलीच तन्वी असल्याचं सत्य मधुभाऊंना समजलं? पाहा VIDEO

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com