Dharmendra: बॉलिवूडमधील प्रसिद्ध खलनायक मुकेश ऋषी यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांच्याशी संबंधित एक भावनिक आठवण शेअर केली आहे. 1992 साली 'हमला' चित्रपटाच्या सेटवर त्यांची धर्मेंद्र यांच्याशी पहिली भेट झाली होती. धर्मेंद्र हे त्यांच्या लहानपणापासूनचे आदर्श होते, पण पहिल्या भेटीत त्यांनी त्यांच्याकडे भेटीला जाणे टाळले.
रेडिओ नशा या कार्यक्रमात बोलताना मुकेश ऋषी म्हणाले, "धर्मेंद्रजी सेटवर आले होते, पण मी त्यांच्याकडे गेलो नाही. मी माझ्या संवादांची तयारी करत होतो आणि त्यांच्याकडे पाहिलेही नाही. माझ्या कपाटात त्यांच्या पोस्टर्स होते, पण मी ठरवले होते की, सीन पूर्ण होईपर्यंत मी त्यांना भेटणार नाही."
शूटिंग पूर्ण झाल्यानंतर मुकेश ऋषी लगेचच धर्मेंद्र यांच्या पायांवर वाकले. ते म्हणाले, "माझ्या मनात त्यांच्याबद्दल इतका आदर होता की, शूटिंगपूर्वी त्यांच्याकडे पाहिले असते, तर मी माझा सीन नीट करू शकलो नसतो. मोठ्यांचा आदर कसा करायचा हे कुठेही शिकवले जात नाही, ते स्वतःहून शिकावे लागते."
मुकेश ऋषी आणि धर्मेंद्र यांनी 'हमला', 'जियो शान से', 'लौह पुरुष' आणि 'न्यायदाता' यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. धर्मेंद्र यांच्याशी काम करणे हे त्यांच्यासाठी एक स्वप्न पूर्ण होण्यासारखे होते, असे त्यांनी नमूद केले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.