Cuttputlli Teaser Saam Tv
मनोरंजन बातम्या

Cuttputlli Teaser: अक्षय कुमार-रकुल प्रीत सिंगच्या 'कठपुतली'चा टीझर आला, 'मिस्टर खिलाडी' दमदार भूमिकेत

खिलाडी अक्षय कुमार आणि अभिनेत्री रकुल प्रीत सिंग यांच्या आगामी 'कठपुतली' चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार(Akshay Kumar) एका वर्षात अनेक चित्रपट करण्यासाठी ओळखला जातो. ४० दिवसांत शूटिंग पूर्ण करणे ही अक्षय कुमारची खासियत आहे. काही दिवसांपूर्वीच अक्षय कुमारचा 'रक्षा बंधन' हा चित्रपट सिनेमागृहात प्रदर्शित झाला होता आणि आता खिलाडी कुमार आणि अभिनेत्री रकुल प्रीत सिंग यांच्या आगामी 'कठपुतली'(Cuttputlli) चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला आहे. टीझरमध्ये अक्षय कुमार पोलिसाच्या भूमिकेत दिसत आहे. मात्र 'कठपुतली' हा चित्रपट थिएटरऐवजी थेट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे.

आदल्या दिवशी, अक्षय कुमारने चित्रपटाचे पहिले मोशन पोस्टर शेअर केले आणि चाहत्यांना सरप्राइज दिले. आता मोशन पोस्टरनंतर अक्षयने चित्रपटाचा टीझर रिलीज केला आहे.

अक्षय कुमारने 'कठपुतली'चा मनोरंजक टीझर रिलीज करताना हे देखील सांगितले की, या चित्रपटाचा ट्रेलर उद्या म्हणजेच २० ऑगस्ट रोजी रिलीज होणार आहे. टीझर रिलीज करताना अक्षयने त्याच्या सोशल मीडिया हँडलवर लिहिले की, 'हा खेळ शक्तीचा नसून युक्तीचा आहे आणि या युक्तीच्या खेळात तू आणि मी… सगळे #कठपुतली आहोत. #कठपुतलीऑनहॉटस्टार २ सप्टेंबर रोजी प्रदर्शित होत आहे. ट्रेलर उद्या प्रदर्शित होईल."

या चित्रपटाच्या टीझरमध्ये अक्षय कुमार आणि त्याच्या टीमची ओळख करून दिली आहे. अक्षय कुमारची ही टीम एका सीरियल किलरचा पाठलाग करतात. टीझरमध्ये अक्षय 'माईंड गेम सीरियल किलरसोबत खेळला पाहिजे, पॉवर गेम नाही' असे त्याच्या टीमला म्हणतो. या छोट्या टीझरने चाहत्यांची उत्सुकता आणखीनच वाढवली आहे.

अक्षय-रकुलच्या हा चित्रपट 'रत्सासन' या तमिळ चित्रपटाचा हिंदी रिमेक आहे. यात एका सायको किलरची कथा आहे जो शाळकरी मुलींची हत्या करतो. 'रत्सासन' या चित्रपटात मुख्य भूमिका अभिनेता विष्णू विशालने साकारली होती. आता त्याच्या हिंदी रिमेकमध्ये अक्षय कुमार मुख्य भूमिकेत दिसणार आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, चित्रपटाचे शूटिंग मसुरीमध्ये सुरू आहे. जॅकी भगनानी आणि दीपशिखा देशमुख यांच्या पूजा एंटरटेन्मेंट फॅमिली बॅनरखाली हा चित्रपट तयार होत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन रणजीत एम तिवारी यांनी केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Classy Co-ord Set: ऑफिस किंवा कॉलेजसाठी ट्राय करा 'हे' क्लॉसी को-ऑर्ड सेट्स

Maharashtra Live News Update : पालघर जिल्ह्याला सोमवारी रेड अलर्ट, प्रशासनाकडून सुट्टी जाहीर

Akash Deep : वडिलांचं छत्र हरपलं, ६ महिन्यांत भावाचाही आधार गेला! कसोटीत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या आकाश दीपचा संघर्षमय प्रवास

'पप्पा मला अ‍ॅडमिशन घेऊन द्या ना'; पैशांअभावी वडिलांचा थांबण्याचा सल्ला; घरी कुणी नसताना लेकीनं आयुष्य संपवलं

Nashik News: नाशिकमध्ये धो धो! गोदामातेची पुरातच आरती, भक्तांची मांदियाळी|VIDEO

SCROLL FOR NEXT