Shrikant Shinde: लोकसभेत खास 'फ्रेंडशिप ग्रुप', श्रीकांत शिंदेंची तरुण सदस्य म्हणून एन्ट्री, नेमकं मिशन काय असणार?

Parliamentary Friendship Groups India: भारताने जागतिक स्तरावर संसदीय मुत्सद्देगिरी मजबूत करण्यासाठी ६४ संसदीय मैत्री गट स्थापन केलेतय. यामध्ये श्रीकांत शिंदे आणि सुप्रिया सुळे यांना महत्त्वाची नेतृत्वाची जबाबदारी देण्यात आली आहे.
Shrikant Shinde
Shrikant Shindesaam tv
Published On

संसदीय मैत्री गटामध्ये (Parliamentary Friendship Groups) नियुक्त करण्यात आलेल्या खासदारांपैकी शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे हे गटाचे नेतृत्व करणारे सर्वात तरुण खासदार ठरले आहेत. ३९ वर्षीय शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे यांची भारत-इंडोनेशिया संसदीय मैत्री गटाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आलीये. त्याचप्रमाणे महाराष्ट्रातीलच आणखी एक खासदार सुप्रिया सुळे यांची भारत-सिंगापूर संसदीय मैत्री गटाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुढाकार घेत भारताने जागतिक स्तरावर 'संसदीय मुत्सद्देगिरी' अधिक मजबूत करण्यासाठी पावलं उचलली आहेत. यामध्ये 'ऑपरेशन सिंदूर'नंतर मिळालेल्या सूचनांनुसार, ६४ देशांसाठी विशेष 'संसदीय मैत्री गट' स्थापन करण्यात आल्याची माहिती आहे. यामध्ये भाजपसह विरोधकांनाही संधी देण्यात आली आहे.

Shrikant Shinde
राज्यसभेसाठी महायुतीच्या उमेदवारांच्या नावांचा सस्पेन्स संपला? आठवलेंचं नाव निश्चित, भाजपकडून ३ जागांवर कुणाला संधी मिळणार?

१८व्या लोकसभेत एकूण ६४ संसदीय मैत्री गटांची स्थापना करण्यात आली आहे. अशोक चव्हाण आणि प्रफुल्ल पटेल हेही दोन या गटांचं नेतृत्व करणार असल्याची माहिती आहे.

या निवडीनंतर श्रीकांत शिंदे यांनी सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. ते म्हणालेत की, “हा क्षण माझ्यासाठी, माझ्या पक्षासाठी आणि महाराष्ट्रातील सर्व नागरिकांसाठी अत्यंत अभिमानाचा आहे. अशा व्यासपीठामुळे भारताचं राजनैतिक हित अधिक मजबूत होणार आहे. लोकशाही, संसदीय तसंच जनतेतील परस्पर संबंध अधिक दृढ होणार आहेत. माझ्या गटातील विविध पक्षांच्या सर्व खासदारांसोबत काम करत भारत-इंडोनेशिया यांच्यातील सांस्कृतिक, आर्थिक आणि सामाजिक भागीदारी अधिक मजबूत करण्यासाठी मी उत्सुक आहे.”

आंतरराष्ट्रीय संसदीय प्रतिनिधीमंडळाचं नेतृत्व करण्यासाठी श्रीकांत शिंदे यांची निवड होण्याची ही दुसरी वेळ आहे. यापूर्वी ऑपरेशन सिंदूरनंतर स्थापन करण्यात आलेल्या सर्वपक्षीय संसदीय प्रतिनिधीमंडळांपैकी एका प्रतिनिधीमंडळात त्यांनी भारताचं प्रतिनिधित्व केलं होतं. मे २०२५ मध्ये त्यांच्या प्रतिनिधीमंडळाने संयुक्त अरब अमिराती, सिएरा लिओन, लाइबेरिया आणि काँगो लोकशाही प्रजासत्ताक या देशांना भेट देत भारताची भूमिका मांडली होती.

Shrikant Shinde
Sharad Pawar: शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, रुबी हॉल क्लिनिकमधून डिस्चार्ज

श्रीकांत शिंदे हे सलग तीन वेळा निवडून आलेले खासदार आहेत. शिवाय ते महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र आहेत.

एनसीपी (एसपी) खासदार सुप्रिया सुळे यांनीही X वर पोस्ट करत नियुक्तीबद्दल कृतज्ञता व्यक्त केलीये. त्या म्हणाल्या 'भारताने साठहून अधिक देशांसोबत संसदीय मैत्री समित्यांची स्थापना केली आहे. यातील सिंगापूर सोबतच्या मैत्री समितीची धुरा लोकसभा अध्यक्ष मा. ओम बिर्ला जी यांनी माझ्याकडे सोपविली आहे. याबद्दल त्यांचे मनापासून आभार. माझ्यासोबत या समितीमध्ये खासदार डॉ टी सुमती, राजेशजी वर्मा, कल्याण बॅनर्जी, हिबी एडन,प्रधान बरुआ जी, के. गोपीनाथ जी, डॉ के लक्ष्मण जी, ॲन्टो ॲन्टनी जी, दिग्विजयसिंह जी आणि तेजवीरसिंह यांचा समावेश आहे.

Shrikant Shinde
Ajit Pawar Death: पुरावे असताना कारवाई का नाही? मरीन ड्राइव्ह पोलिस ठाण्यात रोहित पवार आक्रमक

सिंगापूरच्या संसदेशी थेट संवाद आणि अनुभवाची देवाणघेवाण करण्यासाठी ही समिती कार्यरत राहील. यात एकूण ११ खासदारांचा समावेश आहे. जागतिक पातळीवर भारताचे प्रतिनिधित्व करण्याची ही संधी आपल्या बारामती लोकसभा मतदारसंघातील जनतेने दाखविलेल्या विश्वासामुळे तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्यामुळे मिळाली आहे. याबद्दल त्यांचे मनापासून आभार. आपण दाखविलेला विश्वास सार्थ ठरविण्यासाठी मी सदैव प्रयत्नशील आहे. धन्यवाद, असंही त्यांनी नमूद केलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com