Manasvi Choudhary
उन्हाळ्याच्या दिवसात शरीराला थंडावा आणि उर्जा येण्यासाठी उसाचा रस प्यायला जातो.
नैसर्गिक साखरेचा स्रोत आणि अनेक पोषक घटकांमुळे उसाचा रस हा आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर मानला जातो.
उन्हाळ्यात घामामुळे शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होते. उसाचा रस शरीरातील पाण्याची पातळी टिकवून ठेवण्यास मदत करतो, ज्यामुळे डिहायड्रेशन होत नाही.
उन्हातून प्रवास केल्यानंतर थकवा जाणवल्यास किंवा ऊर्जेची कमतरता वाटल्यास उसाचा रस प्यायल्याने लगेच ताजेतवाने वाटते.
उसाच्या रसात पोटॅशियम असते, जे पचनसंस्था सुरळीत ठेवण्यास मदत करते. हे पोटात होणारी जळजळ किंवा बद्धकोष्ठतेची समस्या दूर करते.
त्वचेसाठी फायदेशीर आहे. हे पिंपल्स कमी करण्यास आणि त्वचेला नैसर्गिक चमक देण्यासाठी मदत करते.