The Sabatmati Report canva
मनोरंजन बातम्या

The Sabatmati Report Movie: राशी खन्ना स्टारर ‘द साबरमती रिपोर्ट’ या तारखेला होणार रिलीज !

The Sabatmati Report Movie Release Date: अभिनेत्री राशी खन्ना स्टारर ‘द साबरमती रिपोर्ट’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Saam Tv

संपूर्ण भारतातील युवा स्टार राशी खन्ना आणि विक्रांत मॅसी यांच्या प्रमुख भूमिका असलेला 'द साबरमती रिपोर्ट’ ची रिलीज डेट जाहीर करण्यात आली आहे. हा चित्रपट 15 नोव्हेंबर 2024 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार असून यात राशी एका रिपोर्टरची भूमिका साकारणार आहे. हा चित्रपट साबरमती एक्स्प्रेस घटनेमागील सत्य उघड करण्याच्या मोहिमेवर आधारित आहे.

निर्मात्यांनी चित्रपटाच्या तीव्रतेची झलक देऊन एका प्रभावी पोस्टरसह रिलीजची तारीख जाहीर केली आहे. चित्रपटाच्या निर्मात्यांनी नवीन पोस्टर शेअर करून त्यांच्या सोशल मीडिया हँडलवर हे नवं पोस्टर पोस्ट केलं आहे " ज्वलंत सत्य 15 नोव्हेंबरला समोर येईल! सोबत रहा! #TheSabarmatiReport फक्त सिनेमागृहात!"

या पोस्टला " ज्वलंत सत्य 15 नोव्हेंबरला समोर येईल! सोबत रहा! #TheSabarmatiReport फक्त सिनेमागृहात!" असं कॅप्शन दिल आहे. रंजन चंदेल दिग्दर्शित हे गुजरातमधील गोध्रा रेल्वे स्थानकाजवळ २७ फेब्रुवारी २००२ रोजी सकाळी साबरमती एक्स्प्रेसमध्ये घडलेल्या घटनेचे तपशीलवार आधारित असून याआधी रिलीज झालेल्या ट्रेलरने राशी आणि विक्रांत भूमिका कशी प्रभावी असणार आहे याची एक झलक दिली होती.

‘द साबरमती रिपोर्ट’ च्या रिलीजच्या पलीकडे राशी खन्ना पुढील चित्रपट ‘तलाखों में एक’ मध्ये पुन्हा विक्रांत मॅसीसोबत स्क्रीन स्पेस शेअर करण्याची तयारी करत आहे जो लवकरच रिलीज होणार आहे. तिच्याकडे ‘तेलुसू काडा’ नावाचा तेलगू चित्रपट देखील आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

घरबसल्या अनुभवा ॲक्शनचा धमाका; 'Kanguva' आता ओटीटीवर, कधी अन् कुठे पाहाल

Wedding Rituals Varmala Cermony: लग्नात वर-वधूला वरमाला का घालतात? नेमकं कारण काय, जाणून घ्या...

हे आहेत डोके आणि मानेचे प्रमुख कर्करोग, प्रतिबंधासाठी जीवनशैलीत करा हे बदल...

IND vs AUS: टीम इंडियाला दुखापतींचं ग्रहण, विराट गेला होता हॉस्पिटलमध्ये, सरावावेळी २ फलंदाज जायबंदी

Hydrogen Railway: देशात लवकरच येणार हायड्रोजनवर चालणारी रेल्वे; वैशिष्ट्ये काय? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT