Hydrogen Railway: देशात लवकरच येणार हायड्रोजनवर चालणारी रेल्वे; वैशिष्ट्ये काय? जाणून घ्या

India's First Hydrogen Railway: देशातील पहिल्या हायड्रोजन रेल्वेचं लवकरच ट्रायल होणार आहे. यामुळे रेल्वेत नवीन क्रांती होणार आहे.
 Hydrogen Railway
Hydrogen RailwaySaam Tv
Published On

मुंबई : (India's Frist Hydrogen Train) भारताचा विकासाचा आलेख हा दिवसंदिवस वाढतच आहे. एकीकडे वंदे भारतने भारताच्या शिरेचेपात मानाचा तुरा रोवल्यानंतर आता लवकरच हायड्रोजन रेल्वेही रूळावर धावणार आहे. हायड्रोजनच्या उर्जेवर ट्रेन चालवण्यासाठी भारत पूर्णपणे तयार आहे. वाहतुकीचे एक साधन ज्याला डिझेल किंवा वीज लागत नाही. कार्बन उत्सर्जन होत नाही आणि वेग इतका आहे ज्यामुळे अतिशय कमी वेळात जास्तीत जास्त अंतर पार केले जाऊ शकते. इतकेच काय तर, पर्यावरणासाठीही ही रेल्वे सुरक्षित आहे. अनेक वैशिष्ट्यांनी सज्ज असलेली हायड्रोजन ट्रेनची चाचणी भारतातील पहिल्या मार्गावर लवकरच सुरू होणार आहे. भारतीय रेल्वे 'हायड्रोजन फॉल हेरिटेज' प्रकल्पांतर्गत हायड्रोजन ट्रेन चालवणार आहे. 2030 पर्यंत शून्य कार्बन उत्सर्जक होण्याच्या उद्देशाने भारत या दिशेने वेगाने वाटचाल करत आहे. हायड्रोजन ट्रेनची ट्रायल रन कधी सुरू होईल? कोणत्या मार्गावर ट्रायल रन सुरू होणार? वेग किती असेल? आणि हायड्रोजन ट्रेनची वैशिष्ट्ये काय असतील? जाणून घेऊया.

 Hydrogen Railway
Central Railway: मध्य रेल्वेचा मोठा निर्णय! मतदारांसाठी विशेष लोकल धावणार, वेळ काय? जाणून घ्या सविस्तर

या रेल्वेमुळे कोणतेही धोकादायक उत्सर्जन होणार नाही

लोकल ट्रेन असो, राजधानी एक्स्प्रेससारख्या हाय-स्पीड ट्रेन असो, हाय-स्पीड वंदे भारत एक्स्प्रेस असो किंवा आलिशान पॅलेस ऑन व्हील्ससारख्या ट्रेन असो सर्व ट्रेन्सना चालण्यासाठी इंधन म्हणून डिझेल किंवा वीज लागते. पण हायड्रोजन ट्रेन ही भारतातील पहिली ट्रेन असेल जी पाण्याच्या शक्तीवर धावेल. या गाड्यांमध्ये हायड्रोजनचा इंधन म्हणून वापर करून वीज निर्मिती केली जाईल.

हायड्रोजनचे ऑक्सिजनशी संयोग होऊन पाणी तयार होते (H2+O2 = H2O), फक्त वाफ आणि पाणी इंधन म्हणून वापरले जाईल. याचा परिणाम असा होईल की हे इंधन पर्यावरणाला धोका निर्माण करणारी कोणतीही गोष्ट उत्सर्जित करणार नाही.

 Hydrogen Railway
Railway Jobs: रेल्वेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी; या पदांसाठी भरती सुरु, पात्रता आणि अर्जप्रक्रिया काय? जाणून घ्या

कोणत्या मार्गावर धावेल?

मीडिया रिपोर्ट्समधून मिळालेल्या माहितीनुसार, हायड्रोजन ट्रेनची चाचणी डिसेंबर 2024 मध्ये सुरू होण्याची अपेक्षा आहे. जर ही चाचणी यशस्वी झाली तर भारत हा हायड्रोजन ट्रेन चालवणारा जगातील 5 वा देश बनेल. याआधी जर्मनी, फ्रान्स, स्वीडन आणि चीनमध्येही हायड्रोजन ट्रेन चालवल्या जात होत्या.

फायनान्शियल एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार, सर्वप्रथम हरियाणातील जिंद ते सोनीपत या 90 किमी लांबीच्या कॉरिडॉरमध्ये ट्रायल रन सुरू होईल. जिंदमध्ये 3000 किलो हायड्रोजन स्टोरेज, हायड्रोजन कॉम्प्रेसरसह दोन हायड्रोजन डिस्पेंसर आणि ट्रेनमध्ये इंधन भरण्यासाठी प्री-कूलर इंटिग्रेशन देखील असेल. याशिवाय, भारतीय रेल्वे दार्जिलिंग हिमालयन रेल्वे, निलगिरी माउंटन रेल्वे, कालका-शिमला रेल्वे इत्यादी डोंगराळ भागातील मार्गांवर हायड्रोजन ट्रेन चालवण्याचा विचार करत आहे. 

 Hydrogen Railway
Government Scheme: विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेण्यासाठी मिळणार बिनव्याजी कर्ज; पीएम विद्यालक्ष्मी योजना नक्की आहे तरी काय?

या प्रकल्पासाठी सरकारचे बजेट किती?

मिळालेल्या माहितीनुसार, भारतीय रेल्वे हायड्रोजन ट्रेन प्रकल्पावरही मोठा खर्च करत आहे. ती प्रामुख्याने हेरिटेज आणि डोंगराळ मार्गांवर चालवण्याचा रेल्वेचा विचार आहे. सध्या, भारतीय रेल्वे 2025 पर्यंत वेगवेगळ्या मार्गांवर 35 हायड्रोजन ट्रेन चालवण्याची योजना आखत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, 35 हायड्रोजन ट्रेनसाठी 2800 कोटी रुपयांचे बजेट ठेवण्यात आले आहे. यासोबतच हेरिटेज मार्गावरील हायड्रोजनशी संबंधित वास्तूंसाठी  600 कोटींचे वेगळे बजेट ठेवण्यात आले आहे.

असे म्हटले जाते की हायड्रोजन ट्रेन ताशी 140 किमी वेगाने चालवल्या जातील, ज्या प्रवाशांना त्यांच्या गंतव्यस्थानावर जलद आणि अतिशय आरामात घेऊन जातील. एकदा हायड्रोजन टाकी पूर्णपणे भरल्यानंतर, ते सुमारे 1000 किमी अंतर सहज पार करेल. या गाड्यांना प्रत्येक तासाला 40,000 लिटर पाण्याची आवश्यकता असेल जेणेकरुन आवश्यक रासायनिक प्रक्रिया चालू राहतील. त्यासाठी पाणीसाठ्यासाठी समर्पित साठाही उपलब्ध करून दिला जाणार आहे. हायड्रोजन ट्रेन केवळ प्रवाशांना त्यांच्या आवडत्या स्थळी उच्च वेगाने नेण्यात मदत करतील असे नाही तर पर्यावरणाच्या संरक्षणातही महत्त्वाची भूमिका बजावतील. 

Edited By- नितीश गाडगे 

 Hydrogen Railway
Success Story: परदेशात शिक्षण,Microsoft ची लाखोंच्या पगाराची नोकरी सोडली, ४० व्या वर्षी उभारली १२००० कोटींची कंपनी

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com