The Raja Saab Collection saam tv
मनोरंजन बातम्या

'धुरंधर'चा खेळ संपला; बॉक्स ऑफिसवर The Raja Saabचं तुफान, प्रभासच्या चित्रपटानं पहिल्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी

The Raja Saab Box Office- Worldwide Collection Day 1 : प्रभासच्या 'द राजा साब' चित्रपटाने पहिल्याच दिवशी बंपर कमाई केली आहे. चित्रपटाचे एकूण कलेक्शन जाणून घेऊयात.

Shreya Maskar

'द राजा साब' चित्रपट 9 जानेवारी 2026 ला रिलीज झाला आहे.

'द राजा साब' मध्ये साऊथ अभिनेता प्रभास मुख्य भूमिकेत आहे.

'द राजा साब'हा हॉरर, कॉमेडी चित्रपट आहे.

प्रभासच्या बहुप्रतिक्षित चित्रपट 'द राजा साब' रिलीज झाला आहे. चित्रपट सुरुवातीपासून बक्कळ कमाई करताना दिसत आहे. 'द राजा साब' चित्रपट 9 जानेवारी 2026 ला रिलीज झाला आहे. चित्रपटातील प्रभासचा हटके अंदाज चाहत्यांना आवडला आहे. रिलीज आधीच चित्रपटाने बंपर कमाई केली आहे. चित्रपटाचे एकूण कलेक्शन जाणून घेऊयात.

'द राजा साब' बॉक्स ऑफिस कलेक्शन

Sacnilk च्या रिपोर्टनुसार, प्रभासच्या 'द राजा साब' चित्रपटाने पहिल्या दिवशी तब्बल 45 कोटी रुपयांची कमाई केली आहे. तर चित्रपटाने पेड प्रिव्ह्यूमधून चित्रपटाने गुरुवारी 9.15 कोटी रुपये कमावले. त्यामुळे चित्रपटाचे एकूण कलेक्शन 54.15 कोटी झाले आहे.

भाषेनुसार कमाई किती?

'द राजा साब'ने पहिल्या दिवशी तेलगू भाषेत चांगली कमाई केली. तेलगू भाषेतील प्रेक्षकसंख्या एकूण 57.16 % इतकी मजबूत होती. सकाळचे शो 50.92 %, दुपारचे शो 50.82%, संध्याकाळचे शो 57.70 % आणि रात्रीचे शो 69.20 %पर्यंत पोहोचले. हिंदी भाषेतील कलेक्शन तुलनेने कमी होते, ज्यात एकूण प्रेक्षकसंख्या 15.63 % होती. सकाळचे शो 7.47% इतके कमी होते, परंतु रात्रीच्या शोपर्यंत त्यात हळूहळू सुधारणा होऊन ते 21.34 % पर्यंत पोहोचले. तमिळ भाषेतील प्रेक्षकसंख्या समाधानकारक होती, एकूण 22.61 %, आणि रात्रीचे शो सुमारे 28 % पर्यंत पोहोचले.

प्रभासच्या 'द राजा साब' चित्रपटात संजय दत्त, बोमन इराणी, मालविका मोहनन, रिद्धी कुमार, योगी बाबू, निधी अग्रवाल आणि ब्रह्मानंदम हे कलाकार झळकले आहेत. हा हॉरर ,कॉमेडी चित्रपट आहे. 'द राजा साब'चे दिग्दर्शन मारुतीने केले आहे. प्रभासच्या अभिनयाचे सर्वत्र कौतुक होत आहे. चित्रपटातील गाणी सोशल मीडियावर ट्रेंड करताना दिसत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: ही लोकशाही आहे, दडपशाही नाही! सुप्रिया सुळेंचा सरकारला इशारा

Aalyache Pani: १५ दिवस आल्याचे १ ग्लास पाणी प्यायल्याने काय होते?

आणखी एका दिग्गज नेत्याची एक्झिट! भाजप आमदार,माजी मंत्र्यांचे निधन! राज्याच्या राजकारणात शोककळा

Drinking Milk At Night: रात्री झोपण्यापूर्वी दूध प्यायल्याने शरीरात काय होतं?

Gold Earrings For Married Woman: महिलांसाठी सोन्याचे कानातले; ‘या’ 5 ट्रेंडी डिझाईन्स पाहा

SCROLL FOR NEXT