Prabhas : बाईsss काय हा प्रकार! प्रभासच्या चाहत्यांनी थिएटरमध्ये लावली आग, प्रेक्षकांमध्ये उडला गोंधळ, पाहा व्हायरल VIDEO

Prabhas-The Raja Saab Viral Video : प्रभासच्या  'द राजा साब' चित्रपटाच्या स्क्रीनिंग दरम्यान मोठा गोंधळ उडाला. चाहत्याने थेट थिएटरमध्ये आग लावली. नेमकं घडलं काय, जाणून घेऊयात.
Prabhas-The Raja Saab Viral Video
Prabhas saam tv
Published On
Summary

साऊथ सुपरस्टार प्रभासचा 'द राजा साब' चित्रपट थिएटरमध्ये रिलीज झाला आहे.

चित्रपटाच्या स्क्रीनिंग दरम्यान प्रभासच्या चाहत्यांनी थिएटरमध्ये आग लावली.

थिएटरमध्ये आग लागली समजताच सर्वत्र गोंधळ उडाला.

साऊथ अभिनेता प्रभासचा 'द राजा साब' हा धमाकेदार चित्रपट 9 जानेवारीला थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. ज्यामुळे चाहते थिएटरमध्ये गर्दी करताना दिसत आहेत. चित्रपटाला पहिल्या दिवशी खूप चांगला प्रतिसाद मिळाला. मात्र या उत्साहाला गालबोट लावणारी घटना घडली. ओडिशातील एका थिएटरमध्ये मोठी दुर्घटना घडली. प्रभासच्या चाहत्यांनी चक्क थिएटरमध्ये आग लावली, ज्यामुळे सर्वत्र गोंधळ उडाला. या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या कृत्याबद्दल लोक अभिनेत्याच्या चाहत्यांवर जोरदार टीका करत आहेत.

मीडिया रिपोर्टनुसार, व्हिडीओत दिसणार थिएटरमध्ये प्रभासच्या चाहत्यांनी कन्फेटी (रंगीत कागद) जाळला, ज्यामुळे आग लागली. हे दृश्य पाहून काही चाहत्यांनी आनंद व्यक्त केला, तर काहींनी त्यांच्यावर टीका केली. व्हिडीओमध्ये चाहते गोंधळ घालताना दिसत आहेत. नेटकऱ्यांनी थिएटरच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. नेटकरी कमेंट्स करत म्हणतात की, अशा कृतींमुळे जीव धोक्यात येऊ शकतो.

व्हिडीओवर कमेंट्स येत आहे की, "हा प्रभासच्या चाहत्यांचा मूर्खपणा आहे. कृपया समजूतदार लोकांसारखे वागा.", "तुम्ही प्रभासचे खरे चाहते असता तर असे कधीही केले नसते..." , "त्याचे मानसिक आरोग्य बिघडलेले दिसते..." हा व्हिडीओ वाऱ्यासारखा इंटरनेटवर व्हायरल होत आहे.

बॉक्स ऑफिस कलेक्शन

प्रभासच्या 'द राजा साब' चित्रपट 9 जानेवारी 2026 ला रिलीज झाला आहे. चित्रपटाच्या दिग्दर्शकाचे नाव मारुती आहेत. Sacnilk च्या रिपोर्टनुसार, चित्रपटाने पहिल्याच दिवसात 45 कोटींची कमाई केली आहे. या चित्रपटात संजय दत्त, बोमन इराणी, मालविका मोहनन, रिद्धी कुमार, योगी बाबू, निधी अग्रवाल आणि ब्रह्मानंदम हे कलाकार झळकले आहेत.

Prabhas-The Raja Saab Viral Video
Ashok Mama : 'बिग बॉस मराठी' सुरू होण्याआधीच अशोक मामांची एक्झिट; मालिकेचा शेवट कसा होणार? पाहा VIDEO

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com