Palghar: शिवीगाळ, धमक्या अन् मानसिक छळ, सावकारांच्या जाचाला कंटाळून व्यावसायिकाची आत्महत्या, ३ पानी सुसाईड नोट सापडली

Palghar Crime: पालघरच्या डहाणूमध्ये सावकाराच्या जाचाला कंटाळून व्यावसायिकाने आत्महत्या केली. राहत्या घरात गळफास घेत त्याने आयुष्य संपवले. आत्महत्येपूर्वी व्यावसायिकाने लिहिलेली ३ पानी सुसाई़़ड नोट पोलिसांना सापडली.
Palghar: शिवीगाळ, धमक्या अन् मानसिक छळ, सावकारांच्या जाचाला कंटाळून व्यावसायिकाची आत्महत्या, ३ पानी सुसाईड नोट सापडली
Palghar CrimeSaam Tv
Published On

Summary -

  • पालघरच्या चिंचणी येथे व्यावसायिकाची आत्महत्या

  • अवैध खासगी सावकारांच्या छळाला कंटाळून आयुष्य संपवलं

  • ३ पानी सुसाईड नोटमध्ये ५ सावकारांची नावे लिहिली

  • पोलिसांनी पाचही जणांविरोधात गुन्हा दाखल केला

  • सध्या सर्व आरोपी फरार असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत

रुपेश पाटील, पालघर

पालघरमध्ये व्यावसायिकाने आत्महत्या केली. डहाणू तालुक्यातील चिंचणी येथे ही घटना घडली. डहाणू तालुक्यात वाढत चाललेल्या अवैध खासगी सावकारीने या व्यावसायिकाचा बळी घेतला. अमानुष व्याजदर, सततचा मानसिक छळ, शिवीगाळ आणि धमक्यांना या त्रासाला कंटाळून एका डायमेकिंग व्यवसायिकाने आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी व्यावसायिकाने सुसाईड नोट लिहिली यामध्ये त्यांनी ५ खासगी सावकरांची नावं लिहिली. या प्रकरणी वानगाव पोलिस ठाण्यात सावकारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस सध्या या प्रकरणाचा तपास करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, डहाणू तालुक्यातील चिंचणी येथे राहणाऱ्या किशोर दवणे या व्यावसायिकाने आत्महत्या केली. किशोर डायमेकिंगचा व्यवसाय करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. व्यवसाय वाढीसाठी त्यांनी नवीन वायरकट मशिन खरेदी केली होती. तसंच वर्कशॉपचे नूतनीकरणही केले होते. यासाठी वेगवेगळ्या सावकरांकडून कर्ज घेतले होते. पण अलीकडील काळात व्यवसायात आलेल्या मंदीमुळे कर्जाचे हप्ते वेळेवर भरणे शक्य होत नव्हते. त्यामुळे सावकाराकडून त्यांचा जाच सुरू होता.

Palghar: शिवीगाळ, धमक्या अन् मानसिक छळ, सावकारांच्या जाचाला कंटाळून व्यावसायिकाची आत्महत्या, ३ पानी सुसाईड नोट सापडली
Mumbai Crime: गार्डनमध्ये एकटीला बघून नियत फिरली, दिव्यांग महिलेसोबत पोलिसाचं भयंकर कृत्य, नागरिकांनी बघितलं अन्...

किशोर दवणे यांनी सावकारांकडून व्याजाने पैसे घेतले होते. सुरुवातीला मदतीचा हात वाटणारी ही रक्कम पुढे जाचक ठरली. घेतलेल्या पैशांपेक्षा अधिक रक्कम परत देऊनही व्याज थकल्याचे सांगत संबंधित सावकारांकडून सातत्याने फोनवरून त्रास दिला जात होता. मानसिक छळ, शिवीगाळ आणि धमक्या दिल्या जात होत्या. रस्त्यात अडवून चारचौघांत अपमानित केले जात होते. त्यामुळे किशोर दवणेंचा मानसिक ताण वाढला होता. याच त्रासाला कंटाळून त्यांनी २ ऑगस्टला राहत्या घरी आत्महत्या केली. बेडरुममध्ये त्यांनी गळफास घेत आयुष्य संपवले होते. या घटनेप्रकरणी पोलिसांनी आकस्मात मृत्यूची नोंद केली होती.

Palghar: शिवीगाळ, धमक्या अन् मानसिक छळ, सावकारांच्या जाचाला कंटाळून व्यावसायिकाची आत्महत्या, ३ पानी सुसाईड नोट सापडली
Crime: सॉफ्टवेअर इंजिनीअरकडून बायकोची हत्या, भररस्त्यात धाडधाड गोळ्या झाडल्या

पण ११ ऑगस्ट रोजी घराची साफसफाई सुरू असताना बेडखाली ३ पानी सुसाईड नोट सापडली. या सुसाईड नोटमध्ये अवैध व्याज व्यवहार, सातत्याचा मानसिक छळ आणि धमक्यांमुळे आत्महत्येचा निर्णय घेतल्याचे त्यांनी स्पष्टपणे नमूद केले होते. नितीन उमराव जैन (वाणगाव), इंद्रदेव विश्वनाथ गुप्ता (चिंचणी), तुषार हरेश साळसकर (चिंचणी), अरविंद रखमाजी पाटील उर्फ पिंटा (अंधेरी, मुंबई) व मंगेश भालचंद्र चुरी (चिंचणी) या ५ खासगी सावकारांची नावे सुसाईड नोटमध्ये लिहिण्यात आली आहेत. त्यानंतर या प्रकरणी व्यावसायिक किशोर दवणे यांचा मुलगा जय यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी पाचही सावकारांविरोधात गुन्हा दाखल केला. पोलिस सध्या या प्रकरणाचा तपास करत आहेत. सध्या सर्व सावकार फरार असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.

Palghar: शिवीगाळ, धमक्या अन् मानसिक छळ, सावकारांच्या जाचाला कंटाळून व्यावसायिकाची आत्महत्या, ३ पानी सुसाईड नोट सापडली
Latur Crime : लातूर हादरलं! पत्नीनेच नवऱ्याचा जीव घेतला, भिंतीवर आपटून केली हत्या

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com