एकाच कुटुंबातील तिघांची सामूहिक आत्महत्या; नोटमुळे गूढ वाढलं, नेमकं घडलं काय?

Heartbreaking Incident in Kalkaji: दिल्लीच्या कालकाजी परिसरातून भयंकर घटना उघडकीस. एकाच घरात आई आणि तिच्या दोन मुलांचे मृतदेह फाशी घेतलेल्या अवस्थेत आढळले.
Heartbreaking Incident in Delhi Kalkaji
Heartbreaking Incident in Delhi KalkajiSaam Tv
Published On

दिल्लीच्या कालकाजी परिसरातून एक ह्रदयद्रावक घटना समोर आली आहे. एकाच कुटुंबातील तिघांचा फाशीवर लटकलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला. आई आणि तिच्या दोन मुलांचा मृतदेह आढळल्यानंतर परिसरात खळबळ उडाली आहे. या सामूहिक हत्येने संपूर्ण परिसर हादरून गेला आहे. पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. तपासादरम्यान, पोलिसांना एका सुसाईड नोट देखील सापडली आहे. मानसिक ताण आर्थिक अडचणींमुळे तिघांनी आत्महत्या केली असल्याची माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कालकाजीतील जी - ७० बी येथील एका घरातून ही घटना उघडकीस आली आहे. घटनेच्या दिवशी स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांसह कोर्ट बेलीफ घरात आले, तेव्हा हे प्रकरण उघडकीस आलं. त्यांचा हेतू कोर्टाच्या आदेशाची अंमलबजावणी करणे आणि घराचा ताबा घेणे हा होता. त्यांनी वारंवार दार ठोठावण्याचा प्रयत्न केला. मात्र, कुणीच प्रतिसाद दिला नाही. पोलिसांनी डुप्लिकेट चावीने घराचे दार उघडले. तेव्हा हे प्रकरण उघडकीस आलं. एकाच कुटुंबातील तिघांचा संशयास्पद स्थितीत मृतदेह आढळला.

Heartbreaking Incident in Delhi Kalkaji
५१ वर्षीय नराधमाची मुलीच्या मैत्रिणींवर वाईट नजर; ३ मुलींच्या अंगावरून हात फिरवला अन्...जाब विचारताच नातेवाईकावर हल्ला

परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आरोग्य कर्मचारी आणि काही पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घराची झडती घेतली. घटनास्थळावरून पोलिसांना एक चिठ्ठी सापडली. यातून कुटुंब दीर्घकाळापासून मानसिक ताण आणि नैराश्याने ग्रस्त असल्याची माहिती मिळाली आहे. आर्थिक परिस्थिती बेताची असल्यामुळे त्यांनी टोकाचे पाऊल उचलले असावे, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला.

Heartbreaking Incident in Delhi Kalkaji
बदलापूर हादरलं! ३ वर्षांनंतर महिलेच्या मृत्यूचं गूढ उकललं; नवऱ्यानंच आखलेला कट, स्टोरी एखाद्या क्राइम स्टोरीसारखी...

सध्या पोलिसांकडून त्यांच्या कुटुंबातील नातेवाईकांची चौकशी सुरू आहे. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला असून, शवविच्छेदनासाठी रूग्णालयात पाठवले आहे. तसेच तपासानंतर नेमकं प्रकरण काय? हे उघड होईल. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली असून, पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com