mystery of Shefali death was solved Saam Tv News
मनोरंजन बातम्या

Shefali Jariwala : शेफालीच्या मृत्यूचं गूढ उकललं, तीन दिवसानंतर कारण आलं समोर; शिळं अन्न उठलं जिवावर

Shefali Jariwala : शेफाली जरीवालाच्या मृत्यूनं सिनेसृष्टीसह तिचे चाहते हळहळले. परंतू तिच्या मृत्यूनंतर झालेल्या खुलाश्यानं सगळेच हादरलेत. असं नेमकं काय घडलं शेफाली सोबत आणि तिच्या मृत्यूचं गूढ उकलल्यानंतर काय समोर आलंय त्यासाठी पाहूया हा एक रिपोर्ट.

Snehil Shivaji

स्नेहील झनके, साम टिव्ही

मुंबई : अभिनेत्री शेफाली जरीवालाच्या मृत्यूनं तिचे चाहते आणि सिनेसृष्टीवर दुखाचा डोंगर कोसळला. परंतू आता तिच्या मृत्यूच्या ३ दिवसांनंतर शेफालीच्या मृत्यूचं खरं कारण तुम्हाला सुन्न करणारेय. काही सवयी आणि फार गंभीर नसणारे आजारही मृत्यूचं कारण ठरु शकतात हेच पुन्हा पाहायला मिळालंय. शेफालीचा मृत्यू झाला त्यादिवशी शेवटच्या 24 तासात तिच्यासोबत काय घडलं यासंदर्भात पोलिसांनी काय खुलासा केला पाहा.

शेफालीच्या मृत्यूचं गूढ उकललं

शेफालीच्या घरी आदल्यादिवशी पूजा

शेफालीनं ठेवला होता उपवास

फ्रिजमधील शिळं अन्न शेफालीनं खाल्लं

त्यानंतर ती खाली कोसळली, तिचा बीपी लो झाला

बेशुद्धावस्थेत रुग्णालयात नेण्यापुर्वी शेफालीचा मृत्यू

शेफालीच्या मृत्यूनंतर तपासात पोलिसांना तिच्या घरातून २ डब्बे औषधं देखील मिळाली. तिच्या घरात 'व्हिटॅमिन सी' आणि 'ग्लुथाथिओन' ही औषध सापडली होती. मागील काही दिवसापासून सुंदर दिसण्यासाठी तसेच तरुण दिसण्यासाठी उपचार घेत होती. तिच्या घरात पुजा असल्यानं तिनं उपवास ठेवला होता. तसंच शिळं अन्न देखिल खाल्याचं समोर आलंय. त्यानंतरच तिची प्रकृती बिघडली आणि तिचा मृत्यू झाला.

शेफालीच्या मृत्यूनंतर प्राथमिक तपासात झालेला खुलासा हा धक्कादायक आहे. भर तारुण्यात शेफालीचा मृत्यूनं सिनेसृष्टीचं नुकसान झालंय. आवडीनं शिळं अन्न खाणाऱ्या आणि शरीर साथ देत नसेल तरी उपवास करणाऱ्या प्रत्येकाच्या डोळ्यात अंजन घालणारी ही घटना आहे. त्यामुळे सुंदर दिसण्याबरोबरच शरीराची काळजी घेणं आणि सुदृढ राहणं देखिल तितकंच महत्वाचंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: विठ्ठल मंदिर जतन संवर्धन कामाचे ऑडिट होणार

Pune Crime : पुण्यात भयंकर घडलं! जेवणासाठी घरी बोलवलं, दारू पाजली; किरकोळ वादातून तरुणाची दगडाने ठेचून हत्या

Youth Drowned: तलाव पाहून पोहण्याचा मोह आला अन् अनर्थ घडला; २० वर्षीय तरुणाचा बुडून मृत्यू

Politics : पंतप्रधान नरेंद्र मोदी विष्णूचे ११वे अवतार; कुणी केलं विधान? वाचा

'Saiyara' तू तो बदला नहीं है... या ट्रेंडींग गाण्याचा अर्थ काय?

SCROLL FOR NEXT