GOAT  canva
मनोरंजन बातम्या

Vijay's GOAT Trailer: सुपरस्टार विजयचा GOAT धुमाकूळ घालणार; ट्रेलरच्या तारखेबाबत मोठा खुलासा

GOAT Movie Release: साऊथचा सुपरस्टार आणि अ‍ॅक्शनचा बादशहा थालापती विजयचा GOAT हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

दमदार अभिनय, अ‍ॅक्शनचा बादशहा थालापती विजयचा जलवा आपल्याला अनेक सिनेमांमध्ये बघायला मिळाला आहे. त्यामुळं तो नेहमीच चर्चेत असतो. आता पुन्हा एकदा त्याची इंडस्ट्रीत जोरदार चर्चा आहे. गोट: ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाइम हा त्याचा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अलीकडेच त्याबाबत एक पोस्ट सोशल मीडियावर टाकल्यानं ट्रेलर कधी येणार अशी उत्सुकता प्रेक्षकांमध्ये आहे. पण आता फार वाट बघावी लागणार नाही. निर्मात्यांनी स्वतःच 'गोट' चित्रपटाच्या ट्रेलरच्या प्रदर्शनाच्या तारखेवरील पडदा हटवला आहे.

दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील सुपरस्टार विजय हा मागील आठवडाभरापासून तुफान चर्चेत आहे. कारणही तसंच आहे. इंडस्ट्रीत तुफान आणणारा त्याचा गोट : ग्रेटस्ट ऑफ ऑल टाइम' हा चित्रपट येतोय. याबाबत प्रेक्षकांमध्ये आधीच प्रचंड उत्सुकता आहे. पण त्याआधी ट्रेलरमुळं ही उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

अलीकडेच निर्मात्यांनी एक पोस्ट शेअर केली आहे. 'गोट'च्या ट्रेलरची रीलीज डेट जाहीर केली आहे. या चित्रपटाचा ट्रेलर १७ ऑगस्टला संध्याकाळी ५ वाजता प्रदर्शित होणार आहे. व्यंकट प्रभूंनी नवीन पोस्टर शेअर करताना कॅप्शनही लिहिली आहे. गेट-सेट-गॉट, तुमचा सीट बेल्ट बांधा. 'गोट'ची मुख्य स्टारकास्ट या पोस्टरमध्ये आहेत.

प्रभू विजयसोबत....

या चित्रपटाद्वारे दिग्दर्शक व्यंकट प्रभू आणि विजय एकत्र काम करत आहेत. त्यामुळे या चित्रपटाचे प्रमोशनल पोस्टर, व्हिडिओ आणि गाण्यांनी सोशल मीडियावर चांगलीच खळबळ उडवून दिली आहे. हा चित्रपट एजीएस एंटरटेन्मेंट प्रॉडक्शनच्या बॅनरखाली तयार केला जात असून, तो अॅक्शनपट असेल, असा आता तरी अंदाज बांधला जात आहे. 'गोट' हा विजयचा ६८ वा चित्रपट आहे.

उत्तर भारतात ३ भाषांमध्ये होणार रीलीज

हा चित्रपट उत्तर भारतात तिन्ही भांषामध्ये प्रदशित होईल, असं सांगण्यात येत आहे. तशी इंडस्ट्रीत चर्चाही आहे. यात तगडी स्टारकास्ट आहे. विजयसोबत माईक मोहन, प्रशांत प्रभू देवा, स्नेहा लैला, जयराम, मीनाक्षी चौधरी आणि योगी बाबू या चित्रपटात झळकणार आहेत. हा चित्रपट ५ सप्टेंबर २०२४ रोजी चित्रपटगृहात येणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rave Party: रेव्ह पार्टी म्हणजे नेमकं काय?

Maharashtra Live News Update: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये कार्यकर्त्यांची इच्छा - नितेश राणे

Masala Gobi Recipe : कोबीच्या भाजीला द्या खास ट्विस्ट, मुलं ५ मिनिटांत फस्त करतील टिफिन

Salman Khan : "वारंवार चुका करणे ही सवय बनते...", सलमान खाननं केली रात्री १२ वाजता पोस्ट

Pune Rave Party: रेव्ह पार्टी प्रकरणात नवं कनेक्शन समोर, क्रिकेट बुकीला बेड्या; खडसेंच्या जावयाकडून पार्टीचं आयोजन

SCROLL FOR NEXT