Manoj Bajpayee And Anurag Kashyap News Saam Tv
मनोरंजन बातम्या

Manoj Bajpayee News : 'सत्या' आणि 'गँग्स ऑफ वासेपूर' एकत्र गाजवला, १२ वर्षे अनुराग कश्यपसोबत एकही चित्रपट नाही; मनोज वाजपेयीने सांगितलं कारण

Chetan Bodke

आपल्या उत्कृष्ट अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजविणारा अभिनेता म्हणजे मनोज बाजपेयी. त्याने आपल्या सिनेकरियरमध्ये चाहत्यांना अनेक सुपरहिट चित्रपट दिलेले आहेत. 'सत्या', 'शुल' आणि 'गँग्स ऑफ वासेपूर' यांसारख्या चित्रपटामुळे अभिनेत्याच्या प्रसिद्धीत बरीच वाढ झाली.

अनुराग कश्यपने मनोज बाजपेयीच्या 'सत्या' आणि 'शूल' या चित्रपटाची कथा लिहिली होती. तर २०१२ मध्ये रिलीज झालेल्या 'गँग्स ऑफ वासेपूर' चित्रपटाचं दिग्दर्शन अनुराग कश्यपने केले होते. पण अनुराग कश्यपने मनोज बाजपेयींसोबत ११ वर्षे एकही चित्रपट केला नाही. त्याचं कारण आता खुद्द मनोज बाजपेयीने एका मुलाखतीतून सांगितले आहे.

'बॉलिवूड बबल'ला दिलेल्या मुलाखतीत मनोज बाजपेयीने अनुराग कश्यपसोबतच्या मैत्रीवर भाष्य केलं आहे. मुलाखतीत मनोज बाजपेयीने सांगितले की, " आमच्या दोघांमध्येही एका गोष्टीमुळे गैरसमज झाला होता. पण आम्ही त्यावर कधीही बोललो नाही. त्या गोष्टीची सोशल मीडियावर खूप खूप चर्चा होत असते. पण त्या गोष्टीचा कधी विचार केला तरी मला लाज वाटते. आमच्या फ्रेंडशिपवर ट्रोलर्स खूप खिल्ली उडवतात. तो माझ्याप्रमाणे चित्रपट बनवत नसल्यामुळे आम्ही एकमेकांसोबत बोलत नव्हतो."

"माझी अनुरागला कोणतीही गरज नव्हती, कारण माझ्या करियरला उतरती कळा लागल्यामुळे तो माझ्यासोबत बोलत नव्हता. म्हणून आम्ही दोघे आपआपल्या आयुष्यात आनंदी होतो. दोघांनाही आपआपल्या आयुष्यात एकमेकांची गरज नव्हती." मनोज बाजपेयी आणि अनुराग कश्यपने १९९८ मध्ये 'सत्या' चित्रपटासाठी पहिल्यांदा एकत्र काम केले होते. याचे दिग्दर्शन राम गोपाल वर्मा यांनी केले होते, तर अनुराग कश्यपने स्टोरी लिहिली होती.

'सत्या' सुपरहिट ठरल्यानंतर त्या दोघांनीही 'शूल'मध्ये एकत्र काम केले होते. मात्र यानंतर दोघांनीही ११ वर्षे एकत्र काम केले नाही. २०१२ मध्ये रिलीज झालेल्या 'गँग्स ऑफ वासेपूर' चित्रपटात मनोज बाजपेयी आणि अनुराग कश्यप यांना एकत्र काम केले होते. पण त्या चित्रपटापासून आजपर्यंत म्हणजे १२ वर्षांनंतर दोघांनीही एकत्र काम केलेले नाही.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bigg Boss Marathi 5 Winner: अखेर तो क्षण आला! 'सुरज'चा गोलीगत विजय, ठरला बिग बॉस मराठी 5 व्या पर्वाचा विनर; मिळाले 'इतके' लाख रुपये

IND vs BAN: अर्शदीप सिंगच्या गतीसमोर बांगलादेशचा सुपडा साफ; भारतापुढे माफक आव्हान

Marathi News Live Updates : उद्योजक जितेंद्र तोरणे यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश, श्रीरामपूरमधून उमेदवारीसाठी इच्छुक

Ashok Saraf: महाराष्ट्राच्या महानायकाची पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर धमाकेदार एन्ट्री

Arabian Sea Shiv Smarak : अरबी समुद्रात शिवस्मारकाचा संभाजीराजेंकडून शोध, जलपूजन झालेलं शिवस्मारक गेलं कुठं?

SCROLL FOR NEXT