singer kk death reason, Singer kk death news updates in Marathi Saam Tv
मनोरंजन बातम्या

Singer KK : केके यांच्या मृत्यूचं कारण आलं समोर; पोस्टमॉटर्म रिपोर्टमधून धक्कादायक खुलासा

singer kk Postmortem Report : पोलिसांनी त्यांच्या अनैसर्गिक मृत्यूची नोंद केली. त्यांच्या मृत्यूनंतर पोस्टमॉटर्म करण्यात आलं. या रिपोर्टमधून केके याच्या मृत्यूचं कारण समोर आलं आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

कोलकाता: गायक कृष्ण कुमार कुन्नथ (KK) यांचे मंगळवारी रात्री कोलकाता (Kolkata) येथे निधन झाले. एका लाइव्ह कॉन्सर्टमधून परतल्यानंतर त्यांची प्रकृती अचानक बिघडली. हॉटेलवर गेल्यानंतर त्यांच्या छातीत दुखू लागले आणि ते जमिनीवर कोसळले. त्यांना तातडीने सीएमआरआय रुग्णालयात नेण्यात आले. डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत (Dead) घोषित केले होते. मात्र, गायक केके (Krishnakumar Kunnath) यांच्या कपाळावर आणि ओठांवर जखमांच्या खुणा आढळल्या आहेत, यामुळे पोलिसांनी त्यांच्या अनैसर्गिक मृत्यूची नोंद केली. त्यांच्या मृत्यूनंतर पोस्टमॉटर्म (Postmortem) करण्यात आलं. या रिपोर्टमधून केके याच्या मृत्यूचं कारण समोर आलं आहे. (The cause of death of singer KK has come to light; Shocking revelations from the postmortem report)

हे देखील पाहा -

शवविच्छेदनाच्या प्राथमिक अहवालानुसार, मायोकार्डियल इनफ्रेक्शन (Myocardial Infarction) म्हणजेच हृदयाचं पंपिंग निष्क्रिय (heart pumping failure) झाल्यामुळे गायक केके यांचा मृत्यू झाला आहे. रिपोर्टनुसार त्यांना किडनी आणि लिवरचाही त्रास होता. शवविच्छेदनाचा हा प्राथमिक अहवाल बरोबर आहे की नाही यासाठी विसरा सॅम्पलची सुद्धा तपासणी केली गेली. सुत्रांच्या माहितीनुसार त्यांना बऱ्याच काळापासून हृदयविकाराची समस्या होती. शवविच्छेदनाच्या प्राथमिक अहवालातून समोर आलंय की, केके यांना पोटातील गॅसची समस्या होती, त्यासाठी ते नेहमी औषधं घेत होते. यासोबतच ३० तारखेला त्यांनी आपल्या पत्नीला हात आणि खांदा दुखत असल्याचंही सांगितलं होतं. (Singer KK Death News updates in Marathi)

प्राथमिक शवविच्छेदन अहवालातून मोठा खुलासा

SSKM रुग्णालयात केके यांचे शवविच्छेदन फॉरेंसिक मेडिसीन प्रमुख इंद्राणी दास, डॉ. अभिषेक चक्रवर्ती आणि डॉ. सायक शोभन यांनी केले आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार हृदयविकाराच्या रुग्णासाठी ३ तास फार महत्वाचे असतात, केके यांनी या तीन तासांकडे दुर्लक्ष केलं. त्यांना आधीपासून त्रास होत होता. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार केके यांनी ३ तास अगोदरपासूनच त्रास जाणवत होता. मंगळवारी सकाळी त्यांना पोटदुखीचाही त्रास होता, याबाबतही त्यांनी आपल्या पत्नीला सांगितलं होतं. तसेच त्यांचा खांदा आणि हात दुखत असल्याचंही त्यांनी आपल्या पत्नीला सांगितलं होतं. प्राथमिक अहवालातून हे समोर आलंय की, हार्ट पंपिंग फेल झाल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला आहे.

या लक्षणांकडे केके यांनी दुर्लक्ष केलं

केके यांनी त्यांना होत असलेल्या त्रासाकडे आणि लक्षणांकडे दुर्लक्ष का केलं असावं हा प्रश्नच आहे. तब्येतीकडे दुर्लक्ष करत त्यांनी शो चालू ठेवला. त्यांना अशी लक्षणं समोर आल्यानंतर त्यांनी डॉक्टरांचा सल्ला घ्यायला हवा होता. पण, त्यांनी कॉन्सर्ट चालूच ठेवला. समोर आलेल्या व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसतंय की, त्यांना त्रास होत होता, त्यांना घाम येत होता, ते वारंवार घाम पुसत होते आणि सारखं सारखं पाणी पीत होते. त्यांनी या लक्षणांकडे दुर्लक्ष केलं नसतं तर कदाचित त्यांना वेळेत उपचार मिळाले असते.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Anant Chaturdashi 2025 live updates : लालबागचा राजा मंडपातून बाहेर; फुलांचा वर्षाव करत मानवंदना; VIDEO

Viral Video: पेट्रोल पंपावर महिलांचा राडा, आधी चप्पल फेकून मारली, नंतर जमिनीवर आपटलं!

Chakli Recipe: मुलांसाठी घरच्या घरी बनवा कुरकुरीत चकली, जाणून घ्या सोपी आणि जलद रेसिपी

Chocolate Recipe: फक्त 'या' ४ पदार्थांपासून बनवा चॉकलेट, तोंडात टाकताच विरघळेल

Maharashtra Live News Update: मुंबई स्फोटकांनी उडवून देण्याच्या कालच्या थ्रेडनंतर मुंबई पोलिस सतर्क

SCROLL FOR NEXT