Jui Gadkari Video Saam Tv
मनोरंजन बातम्या

Jui Gadkari Video: 'एका छोट्याशा अपघातामुळे... ' जुई गडकरीने सांगितलं सर्जरीमागचं कारण

Jui Gadkari News: अभिनेत्री जुईने गडकरीने नुकतंच व्हिडीओच्या माध्यमातून शस्त्रक्रियामागचं कारण सांगितलं आहे.

Manasvi Choudhary

छोट्या पडद्यावरील 'ठरलं तर मग' या मालिकेतून घराघरात पोहचलेली अभिनेत्री जुई गडकरी सध्या तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. अलिकडेच अभिनेत्रीने रूग्णालयात असल्याची माहिती सोशल मीडियावर दिली होती. तेव्हापासून तिचे चाहते चिंतेत होते. दरम्यान जुईने तिची शस्त्रक्रिया झाली आहे असे सांगितले होते. आता जुईने व्हिडीओच्या माध्यमातून तिला नेमकं काय झालं आहे. याबाबतचा खुलासा केला आहे.

जुईने तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर व्हिडीओ पोस्ट केली आहे. या व्हिडीओमध्ये जुईने, "हॅलो... आज बऱ्याच दिवसांनी व्हिडीओ करत आहे. सगळे मला विचारत होते काय झालं होतं? तर जुलैमध्ये एका छोट्याशा अपघातामध्ये माझ्या डाव्या कानाचा पडदा फाटला होता आणि रक्त आलं होतं. मला खूपच त्रास होत होता आणि त्यामुळे ऐकूसुद्धा येत नव्हतं. त्यामुळे कान बरा होईल म्हणून आम्ही वाट बघत होतो. कारण पडदा आपोआप बरा होतो. आम्ही खूप वाट बघितली पण तो काही बरा झाला नाही. त्यामुळ मग सर्जरी करण्याचं ठरवलं आणि त्यामुळे तुम्ही माझ्या कानामध्ये जो कापूस बघत होता तो त्यासाठीच होता. यासाठी आम्ही मालिकेचे कथानक वैगेर सर्वाचे आभार व्यक्त करत या सर्वांनी मला खूप सांभाळून घेतलं मी पाच दिवसांसाठी सुट्टीवर गेले."

दरम्यान जुईने, "पाच दिवसांच्या सुट्टीनंतर मी पुन्हा जोमाने शूटिंगला आलेली आहे आणि ह्या सगळ्या दरम्यान माझ्या टीमने मला खूप धीर दिला. कारण तेव्हा माझ्या सहकलाकारांनादेखील बरं वाटत नव्हतं. पण आम्ही आमच्या एपिसोड्सची बँक बनवली होती. मालिकेचे कथानक वैगेरे त्यानुसार सांभाळलं आणि त्यामुळे प्रियाने मला ढकललं. मात्र आता पुढचे काही दिवस काळजी घ्यायची आहे. सर्जरीच्या दरम्यान, चॅनलनेसुद्धा मला खूप पाठिंबा दिला आणि सांभाळून घेतलं."

अभिनेत्री जुई गडकरी सध्य 'ठरलं तर मग' या मालिकेतून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. मालिकेतील सायली- अर्जुन यांच्या जोडीला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलं.

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

SCROLL FOR NEXT