Jui Gadkari Saam Tv
मनोरंजन बातम्या

Tharla Tar Mag: बाप्पाचा आशीर्वाद अन् टीमचं सहकार्य; कानाच्या शस्त्रक्रियेनंतर जुईचं 'बॅक टू वर्क'

Tharla Tar Mag Actress Jui Gadkari: काही दिवसांपासून जुईने मालिकेतून ब्रेक घेतला होता. सोशल मीडियाद्वारे जुईने चाहत्यांना याबाबतची माहिती दिली होती.

Manasvi Choudhary

अभिनेत्री जुई गडकरी ठरलं तर मग या मालिकेतून घराघरांत पोहचली आहे. मालिकेतील जुईच्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली. मालिकेत जुई साकारत असलेल्या भूमिकेवर तिचे मनापासून प्रेम आहे. 'इच्छा तिथे मार्ग' या म्हणीचा अनुभव अभिनेत्री जुईने घेतला आहे.

अलिकडेच काही दिवसांपासून जुईने मालिकेतून ब्रेक घेतला होता. सोशल मीडियाद्वारे जुईने चाहत्यांना याबाबतची माहिती दिली होती. जुईने एका छोट्या अपघातामध्ये तिच्या कानाला दुखापत झाल्याचे सांगितले होते. सुरूवातीला जुईला वाटलं की हे दुखणं काही दिवसात बरं होईल पण हे दिवसेदिवस वाढतच गेलं. यानंतर जुईने डॉक्टरांकडे जाऊन तपासणी केली. यानंतर जुईच्या कानाची शस्त्रक्रिया झाली.

जुईने हा काळ तिच्यासाठी अत्यंत कठीण आणि कसोटीचा असल्याचं सांगितलं आहे. जुईने आता परत तिच्या कामाला सुरूवात केली आहे. दरम्यान मालिकेतील प्रतिमाच्या एण्ट्रीनंतर सायली आणि प्रतिमाचे अनेक भावनिक क्षण सुरू आहेत. जुईने एका इमोशनल सीनसाठी अंगाई गायली. कानाच्या पडद्याला इजा झाल्यामुळे आवाजातले चढ- उतार कळत नव्हते. मात्र मालिकेचे दिग्दर्शक सचिन गोखले आणि संपूर्ण टीमने जुईला सपोर्ट केला. आणि जुईने खूप चांगल्याप्रकारे सीन साकारला. शस्त्रक्रियेसाठी आठवडाभराची सुट्टी गरजेची होती. जुईने शूटिंग संपवून मगच शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. बाप्पाचा आशीर्वाद आणि संपूर्ण टीमच्या सहकार्यामुळेच हे मी करू शकले आहे. असं जुईने सांगितलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Instagram: इन्स्टाग्राम युजर्सचे टेन्शन वाढलं, १.७६ कोटी अकाऊंट्सचा डेटा लीक, तुम्हाला 'हा' मेसेज आला तर चुकूनही...

Maharashtra Live News Update : जालन्यात ऐन महानगरपालिका निवडणुकीच्या काळात आधार, पॅन आणि मतदान कार्ड कचऱ्यात

Archana Puran Singh: अर्चना पूरन सिंहला झालेला गंभीर CRPS आजार नेमका आहे तरी काय? जाणून घ्या एका क्लिकवर

Nose Blackheads Removal Tips: नाकावरचे ओपन पोअर्स कसे घालवायचे? घरगुती 4 सोपे उपाय करा

Women Health Care: महिलांनी आपल्या आरोग्याची काळजी कशी घ्यायची; स्त्रीरोग तज्ज्ञांनी सांगितलं 'हे' सल्ले

SCROLL FOR NEXT