Tharala Tar Mag SAAM TV
मनोरंजन बातम्या

Tharala Tar Mag : अर्जुनवर पुन्हा हल्ला; सायलीचा जीवही धोक्यात, श्वेताचा प्लान फसणार की...| VIDEO

Tharala Tar Mag Serial Update : 'ठरलं तर मग' मध्ये पुन्हा एकदा मोठा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. अर्जुनवर दसुऱ्यांदा जीवघेणा हल्ला होतो. मालिकेत पुढे काय घडणार जाणून घ्या.

Shreya Maskar

श्वेता आखतं नवं कट कारस्थान

अर्जुनवर दुसऱ्यांदा होतो हल्ला

सायलीचा जीवही धोक्यात

'ठरलं तर मग' मालिकेत सायलीच्या डोहाळे जेवणापासून एकामागून एक ट्विस्ट येताना पाहायला मिळत आहेत. आश्रमातील मुलींची तस्करी केल्याप्रकरणी भर डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमा सायलीला पोलीस अटक करतात. प्रियाचा प्लान यशस्वी होतो. त्यानंतर अर्जुन सायलीची केस हातात घेतो आणि तिला जेल मधून बाहेर काढतो. मात्र अद्याप सायली निर्दोष सिद्ध झालेली नसते. त्यामुळे अर्जुन सायलीला निर्दोष सिद्ध करणारे पुरावे शोधत असतो. तेव्हा त्याच्यावर जीवघेणा हल्ला होतो आणि तो थेट हॉस्पिटलमध्ये पोहचतो.

अर्जुनवर झालेल्या हल्ल्यामुळे सुभेदार कुटुंबावर मोठे वादळ येते. त्यानंतर अर्जुनच्या मदतीने गरोदर असलेली सायली केसची सूत्र आपल्या हातात घेऊन स्वतःची केस कोर्टात लढते. एकीकडे सायलीला अनेक पुरावे मिळतात तर दुसरीकडे अर्जुनही बरा होताना दिसतो. 'ठरलं तर मग'च्या नवीन प्रोमोमध्ये अर्जुन बरा होऊन घरी आलेला दिसतो. फक्त त्याला चालता येत नसते. अशात आता अर्जुनवर घरी दुसऱ्यांदा जीवघेणा हल्ला होतो.

'ठरलं तर मग' च्या प्रोमो व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, श्वेता सायली आणि अर्जुनला जीवे मारण्याची सुपारी देते. ती म्हणते की, "सायली-अर्जुन दोघांनाही संपवा..." त्यानंतर अर्जुन रुममध्ये बसलेला असताना मारेकरी मागून त्याच्यावर कुऱ्हाडीने हल्ला करण्याचा प्रयत्न करतात. मात्र अर्जुन त्यांचा प्लान फ्लॉप करतो. अर्जुन वेळीच सावध होतो आणि आपला जीव वाचवण्यासाठी मारेकऱ्यांसोबत दोन हात करतो. अर्जुनला चालता येत नसते तरी तो स्वतःचा जीव वाचवतो आणि मारेकऱ्यांसोबत मारामारी करतो. मारेकरी पळून जातात तेव्हा अर्जुन त्यांना पकडण्याचा प्रयत्न करतो. एका मारेकऱ्याच्या पायाला पकडून तो रुममधून हॉलपर्यंत येतो. तेव्हा त्याला खूप दुखापत होते आणि मारेकरीही पळून जातात. तेवढ्यात घराच्या दरवाजावर सायली येते आणि अर्जुनला बेशुद्ध झालेले पाहून तिला धक्का बसतो आणि ती घाबरते.

व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलं की, "अर्जुनला मारण्याचा श्वेताचा हा प्लॅन फसणार..." 'ठरलं तर मग' मालिकेचा हा खास भाग गुरुवार १७ सप्टेंबर रात्री ८.३० वाजता स्टार प्रवाह वाहिनीवर पाहायला मिळणार आहे. प्रेक्षक या व्हिडीओवर भरभरून कमेंट्सचा वर्षाव करत आहे. येणाऱ्या भाग खूपच मनोरंजक असणार आहेत. सायली श्वेताचे खोटे आणि प्रियाचा प्लान कसा सर्वांसमोर आणणार, सत्य कसे शोधणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. तसेच गरोदर सायली स्वतःचा आणि अर्जुनला जीव कसा वाचवणार पाहायला प्रेक्षकही उत्सुक आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

राज्यात १० टक्के पाणीकपात! शेतकऱ्यांसाठीही मोठा निर्णय; दिवाळीआधी मिळणार मदत?

Silk Saree For Womens: महिलांसाठी सिल्क साड्यांचे लेटेस्ट कलेक्शन, हे 5 पॅटर्न्स तुम्हाला नक्की आवडतील

Kolhapur Fort : गड-किल्ल्यांच्या शौर्य गाथेतील मानाचा तुरा, कोल्हापूरमध्ये आजही दिमाखात उभा आहे 'हा' किल्ला

Satara DCC Bank Election: सातारा जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीत मोठी घडामोड; उदयनराजे भोसलेंनी दुसऱ्यांदा मारली बाजी

Maharashtra News Live Update: सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत उदयनराजे भोसलेंची संचालकपदी बिनविरोध निवड

SCROLL FOR NEXT