Kolhapur Fort : गड-किल्ल्यांच्या शौर्य गाथेतील मानाचा तुरा, कोल्हापूरमध्ये आजही दिमाखात उभा आहे 'हा' किल्ला

Shreya Maskar

कोल्हापूर

पारगड किल्ला कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड तालुक्यात, महाराष्ट्र-गोवा सीमेच्या जवळ असलेला ऐतिहासिक डोंगरी किल्ला आहे.

Kolhapur | google

पारगड किल्ला उंची?

घनदाट हिरवाई, शांत वातावरण, सह्याद्रीच्या रांगा आणि शिवकालीन इतिहास यामुळे पारगड हे हिडन लोकेशन आहे. पारगड किल्ल्याची उंची सुमारे २,४२० फूट (७३८ मी.) असून किल्ल्याचे क्षेत्रफळ अंदाजे ४८ एकर आहे.

Pargad Fort | google

किल्ला कोणी कधी , का?

पारगड किल्ल्याची उभारणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात १६७६ मध्ये करण्यात आली. गोव्याच्या दिशेने झालेल्या मोहिमेतून परतताना शिवाजी महाराजांनी या डोंगराचे भौगोलिक आणि सामरिक महत्त्व ओळखले. पोर्तुगीज, आदिलशाही आणि सावंतवाडीचे खेम सावंत यांच्यावर नजर ठेवण्यासाठी या ठिकाणी किल्ला उभारण्यात आला.

Fort | google

ट्रेकिंग

पारगडचा ट्रेक तुलनेने सोप्या ते मध्यम अवघडपणाचा मानला जातो. किल्ल्याच्या पायथ्याच्या परिसरातून जंगलवाट, खडकाळ चढ आणि डोंगररांगेतून पुढे जात माथ्यावर पोहोचता येते.

Trekking | google

पावसाळा

पावसाळ्यात परिसर अत्यंत हिरवागार होतो; मात्र घसरडी वाट, चिखल आणि पाण्याचे प्रवाह यामुळे काळजी घेणे आवश्यक आहे. येणाऱ्या सुट्ट्यांमध्ये नक्की ट्राय करा.

rainy season | google

किल्ल्याची रचना

पारगडला तीन बाजूंनी नैसर्गिक कड्यांचे संरक्षण मिळते. त्यामुळे किल्ल्याची संरक्षणव्यवस्था केवळ मानवनिर्मित तटबंदीवर अवलंबून नव्हती. किल्ल्यावर आजही तटबंदी, बुरुज, पाण्याची टाकी आणि मंदिरांचे अवशेष पाहायला मिळतात.

Fort structure | google

किल्ल्यावर काय पाहता येते?

भगवती भवानी मंदिर, छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा, पाण्याची टाकी, प्राचीन तटबंदी, बुरुज आणि किल्ल्यावरील जुने अवशेष पाहायला मिळतात.

What can be seen at the fort? | google

टीप

वरील माहितीचा उद्देश केवळ ऐतिहासिक वारसा आणि पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही ऐतिहासिक वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.

Note | google

NEXT :  नावच सांगतंय इतिहास! शिवरायांनी घेतलेल्या विश्रांतीमुळे प्रसिद्ध झाला किल्ला

Nashik Fort | AI PHOTO
येथे क्लिक करा...