Shreya Maskar
महाराष्ट्रातील विश्रामगड किल्ला पट्टा किल्ला म्हणूनही ओळखला जातो. विश्रामगड हा नाशिक आणि अहिल्यानगर जिल्ह्यांच्या सीमेच्या परिसरातील कळसुबाई डोंगररांगेत आहे.
विश्रामगडाचा माथा मोठ्या पठारासारखा आहे. त्यामुळे इतर अनेक अरुंद डोंगरी किल्ल्यांच्या तुलनेत येथे वर पोहोचल्यानंतर तुलनेने विस्तीर्ण सपाट भाग अनुभवायला मिळतो.
कळसुबाई पर्वतरांगेच्या परिसरातील या गडाची समुद्रसपाटीपासून उंची सुमारे १,३९२ मीटर (४,५६२–४,५६७ फूट) आहे. किल्ल्यावरून आजूबाजूच्या सह्याद्रीचे विस्तीर्ण दृश्य दिसते.
विश्रामगड किल्ल्यावर जाण्यासाठी मुंबई टू नाशिक ट्रेनने प्रवास करा. नाशिक स्टेशनपासून किल्ल्याच्या पायथ्याचे प्रमुख गाव पट्टेवाडीपर्यंत रिक्षाने जा. पुढे ट्रेक करा.
उपलब्ध ऐतिहासिक माहितीनुसार, किल्ल्याचे मूळ बांधकाम बहमनी सल्तनतीच्या काळात, साधारण १४व्या–१५व्या शतकात झाले असावे.
किल्ल्याचे सर्वात मोठे ऐतिहासिक वैशिष्ट्य म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी येथे मुक्काम केला होता. शिवाजी महाराज १६७९ मध्ये आजारातून बरे होण्यासाठी आपल्या सैन्यासह येथे राहिले होते.
याशिवाय गडावरील त्र्यंबक दरवाजा, अंबरखाना, पाण्याच्या टाक्या, तटबंदी, पट्टाई देवी मंदिर आणि आजूबाजूचे सह्याद्रीचे दृश्य ही त्याची प्रमुख आकर्षणे आहेत.
नाशिकला गेल्यावर पांडवलेणी, रामशेज किल्ला, त्र्यंबकेश्वर मंदिर, पंचवटी, अंजनेरी या ऐतिहासिक आणि धार्मिक ठिकाणांना आवर्जून भेट द्या.
वरील माहितीचा उद्देश केवळ ऐतिहासिक वारसा आणि पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही ऐतिहासिक वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.