Manasvi Choudhary
सिल्क साड्यांची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. आजकाल महिला कार्यक्रमामध्ये, सणासुदीला सिल्क साड्या नेसतात.बाजारात सिल्क साड्यांमध्ये अनेक आकर्षक रंग, पॅटर्न्स आणि डिझाईन्स उपलब्ध आहेत.
सिल्क साड्या या हलक्या आणि सुंदर दिसतात. जर तुम्हालाही सिल्क साड्या घ्यायच्या असतील तर तुम्ही लेटेस्ट पॅटर्न्सच्या 5 साड्या निवडा.
लग्नसमारंभासाठी प्रामुख्याने लाल, मरून किंवा गडद रंगांच्या सिल्क साड्या नेसण्याची परंपरा आहे. जरीचे काम आणि भरजरी बॉर्डर असलेल्या या साड्या नववधूचा किंवा सवाष्णीचा लूक परिपूर्ण करतात.
ऑफिस मीटिंग, पूजा किंवा एखाद्या छोट्या घरगुती कार्यक्रमासाठी जर तुम्हाला साडी नेसायची असेल, तर वजनाला हलक्या आणि नेसायला सोप्या असणाऱ्या लाईटवेट सिल्क साड्या उत्तम पर्याय ठरतात.
रिसेप्शन किंवा ग्रँड पार्टीसाठी हेवी वर्क केलेल्या डिझायनर सिल्क साड्यांची निवड केल्यास संपूर्ण लूक राजेशाही आणि लक्षवेधी दिसतो.