Manasvi Choudhary
आजकाल आपल्यापैकी अनेकजण कपडे धुण्यासाठी वॉशिंग मशीनचा वापर करतात. वॉशिंग मशीनमुळे कपडे धुण्याचे काम खूप सोपे झाले असले, तरी काळजीॉ घेणे महत्वाचे आहे.
वॉशिंग मशीनमध्ये काही कपडे जर धुतले, तर ते खराब होऊ शकतात किंवा फाटू शकतात. वॉशिंग मशीनमध्ये कोणते कपडे धुणे टाळावे आणि धुतल्यास काय नुकसान होते? हे या वेबस्टोरीतून जाणून घ्या.
ब्रा आणि पॅन्टीज यांसारखे इनरवेअर कधीही मशीनमध्ये धुवू नयेत. मशीनच्या फिरण्याच्या वेगामुळे ब्राचे कप्स चपटे होतात, तिचे हुक खराब होऊ शकतात आणि कपड्याचे इलास्टिक सैल पडू शकतात.
रेशमी आणि सॅटिनचे कपडे अत्यंत नाजूक असतात. मशीनमध्ये हे कपडे धुतल्याने एकमेकांत अडकून फाटू शकतात. हे कपडे नेहमी सौम्य डिटर्जंटने हाताने स्वच्छ धुणे योग्य ठरते.
काश्मीर कपड्यांचे स्वेटर मशीनमध्ये धुतल्याने त्याचे धागे आणि सूत निघण्याची शक्यता खूप जास्त असते, ज्यामुळे स्वेटरचा आकार पूर्णपणे बिघडतो.
लेदरचे जॅकेट, पॅन्ट किंवा स्कर्ट कधीही पाण्यात किंवा मशीनमध्ये धुवू नयेत. पाण्यामुळे लेदरच्या नैसर्गिक पोतवर वाईट परिणाम होतो, लेदरला तडे जातात आणि त्यावरील आवरण निघून कपडा पूर्णपणे खराब होऊ शकतो.
जाळीदार कपडे, डिझायनर नेटचे टॉप्स किंवा साड्या अतिशय नाजूक असतात. मशीनच्या चक्रात अडकून नेटचे कपडे सहजपणे तुटतात किंवा फाटू शकतात.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.