Manasvi Choudhary
चेहऱ्यावर गुलाब पाणी लावल्याने त्वचा नेहमी तरुण, टवटवीत आणि ताजेतवाने दिसते. तुम्ही जर सलग 30 दिवस म्हणजेच महिनाभर चेहऱ्यावर गुलाबपाणी लावले तर सकारात्मक बदल होतात.
रोज रात्री किंवा दिवसा गुलाब पाणी लावल्याने त्वचेला कोणते फायदे होतात ते या वेबस्टोरीतून जाणून घ्या.
गुलाबजल त्वचेतील ओलावा टिकवून ठेवण्यास आणि कोरडेपणा दूर करण्यास मदत करते. हे त्वचेच्या आत जाऊन त्वचेला योग्य तो मऊपणा आणि ओलावाे देते.
गुलाबपाण्यामध्ये नैसर्गिक अँटी-इन्फ्लॅमेटरी गुणधर्म असतात. यामुळे त्वचेवर होणारी जळजळ, खाज किंवा लालसरपणा शांत होतो.
जर चेहऱ्यावर पिंपल्स, मुरुम किंवा काळे डाग असतील, तर नियमित चेहऱ्यावर गुलाबपाणी लावा यामुळे चेहरा स्वच्छ होण्यास मदत होते. डाग कमी होतील.
गुलाबजल नॅचरल टोनर म्हणून वापरले जाते. जे त्वचेचे पोअर्स कमी करतात. चेहऱ्यावर येणाऱ्या सुरकुत्या कमी होतात आणि चेहरा कायम फ्रेश व तरुण दिसतो.
त्वचेवर तेलकटपणा असेल जर तुमची त्वचा अतितेलकट असेल, तर गुलाबजल लावा. गुलाबजल लावल्याने त्वचेचे पीएच (pH) लेव्हल संतुलित राहते आणि चेहऱ्यावर जमा होणारे अतिरिक्त तेल नियंत्रित होते.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.