Manasvi Choudhary
डायबिटीज रुग्णांना खाण्या पिण्याच्या बाबतीत खूप काळजी घ्यावी लागते. रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी फळांचे सेवन योग्य प्रमाणात केले जाते.
फळांमध्ये नैसर्गिकरित्या साखरेचे प्रमाण अधिक असल्याने फळे खाताना विशेष काळजी घेणे महत्वाचे आहे.
सफरचंद आणि पेरू या दोन्हीपैकी डायबिटीजच्या रुग्णांसाठी कोणते फळ सर्वात जास्त फायदेशीर आहे? ते या वेबस्टोरीतून जाणून घ्या.
सफरचंदाचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो ज्यामुळे रक्तातील साखर अचानक वाढण्याचा धोका कमी असतो.
सफरचंदात भरपूर प्रमाणात फायबर असते, जे पचनक्रिया मंदावते त्यामुळे शरीरात साखर हळूहळू कमी होते.
पेरूचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो. तसेच पेरूमध्ये साखरेचे प्रमाण अत्यंत कमी असते.
पेरू शरीरातील इन्सुलिनची संवेदनशीलता सुधारण्यास मदत करते.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.