Manasvi Choudhary
ऑक्टोबर महिन्यात नवरात्री आणि करवा चौथ हे सण येतात. या सणांना तुम्हालाही स्टायलिश आणि हटके दिसायचं असेल तर बॉर्डर प्रिंट साडी निवडा.
बॉर्डर प्रिंट कॉटन साडी तुम्ही प्रिटेंड ब्लाऊज आणि ऑक्सिडाइज्ड ज्वेलरीसोबत नेसा ज्यामुळे लूक आणखी सुंदर दिसेल.
तुम्हाला जर सिंपल आणि आकर्षक साडी हवी असेल तर तुम्ही जॉमेट्रिक कॉटन साडी निवडा.
हॉल्टर नेक ब्लाऊज आणि लॉन्ग कानातले या लूकवर जॉमेट्रिक कॉटन साडी लूक उठून दिसेल.
नेव्ही ब्लू आणि पांढऱ्या या दोन्ही मिक्स कलरची इंडिगो ब्लॉक प्रिटेंड साडी कोणावरही खुलूनच दिसते. व्ही नेक ब्लाऊज आणि ऑक्सिडाइज्ड ज्वेलरीसोबत हा लूक सुंदर दिसतो.
फिकट गुलाबी रंगाची पोल्का डॉट डिझाईन असलेली कॉटन साडी तुम्ही खास सणासुदीसाठी निवडू शकता. ही साडी वजनाला अत्यंत हलकी असल्याने कम्फर्टेबल वाटते. या साडीलूकवर तुम्ही कश्मिरी बांगड्या घाला.
आर्ट प्रिंट कॉटन साडी ही डिझाईन तुम्ही निवडू शकता. या साडीच्या बॉर्डरला डिझाईन असते त्यामुळे साडीचा हा पॅटर्न उठून दिसतो. पारंपारिक लूक आणि सणासुदीसाठी तुम्ही आर्ट प्रिंट कॉटन साडी निवडू शकता.
कॉटन साड्यांमध्ये तुम्ही विविध रंगाचे पॅटर्न निवडू शकता. या साड्यांवर ब्लाऊजची डिझाईन व्हि- नेक, हॉल्टर आणि सिव्हलेज अत्यंत सुंदर दिसते.