Tharala Tar Mag 
मनोरंजन बातम्या

Tharala Tar Mag : प्रियाचे नवे कट कारस्थान; अर्जुन-सायलीला करणार उद्ध्वस्त, जेलमध्ये राहून रचणार 'हा' मोठा खेळ | VIDEO

Tharala Tar Mag Update : 'ठरलं तर मग!' या मालिकेत आता मोठा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. प्रिया अर्जुन-सायली विरोधात नवीन कट कारस्थान रचते. मालिकेत पुढे काय घडणार, जाणून घेऊयात.

Shreya Maskar

'ठरलं तर मग!' मालिकेत मोठा ट्विस्ट

प्रिया जेलमध्ये राहून अर्जुन-सायली विरोधात करणार कट कारस्थान

अर्जुन-सायली पावसात गेले रोमँटिक डेटवर

'ठरलं तर मग!' या मालिकेला प्रेक्षक भरभरून प्रेम देत आहेत. अलिकडेच सायलीला समजते की तीच तन्वी आहे. त्यामुळे सुभेदार कुटुंबाच्या घरात आनंदाचे वातावरण पाहायला मिळते. अखेर सायलीला तिचे खरे कुटुंब मिळते. तिच्या आई-वडीलांची ओळख होते. अशात आता 'ठरलं तर मग!' मध्ये सायली - अर्जुन पावसात रोमँटिक डेट करताना दिसत आहेत. अर्जुन आपल्या लहानपणीच्या मैत्रीणीसोबत तन्वीसोबत पावसात फिरायला जातो.

'ठरलं तर मग!' च्या प्रोमोमध्ये दोघे एकत्र सुंदर वेळ घालवताना दिसतात. सायली सुंदर ड्रेस घालून येते. रस्त्यावरचा वडापाव खाण्यासाठी अर्जुनकडे हट्ट करते. दोघे एकत्र वडापाव खातात. सायलीच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून अर्जुन खूपच खुश होतो. दोघे आनंदाने दिवस घालवतात. सायलीला इतकं सुंदर नटलेले पाहून अर्जुन तिच्याकडे पाहतच राहतो. तर दुसरीकडे प्रिया जेलमध्ये राहून अर्जुन-सायली विरोधात नवीन कट कारस्थान करताना दिसते.

प्रियाला तुरुंगात भेटायला एक मुलगी येते. ती चेहरा झाकून येते. प्रिया तिला बोलते की, "तू स्कार्फ काढू शकते आता. माझं तुझ्याकडे खूप महत्त्वाचे काम आहे आणि हे काम फक्त तू करू शकतेस..." 'ठरलं तर मग!' मालिका रोज रात्री ८:३० वाजता प्रसारित होते. आता येणाऱ्या भागांमध्ये सायली - अर्जुनच्या आयुष्यात नवीन कोणते वादळ येणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

'ठरलं तर मग!' मालिकेत अस्मिताचा नवरा देखील प्रियाशी हात मिळवणी करताना दिसणार आहे. तो देखील प्रियाला भेटायला जेलमध्ये जातो. तर दुसरीकडे मधु भाऊंची तब्येत पुन्हा बिघडते. त्यांना आश्रमाची चिंता लागून आहे. तेव्हा आता येणाऱ्या भागांमध्ये सायला आश्रमाची जबाबदारी घेताना दिसणार आहे. आता सुभेदारांच्या आयुष्यात नवे कोणते वादळ येणार, पाहणे मनोरंजक ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

MP Disqualification: आता सुप्रीम कोर्टात लागणार बंडखोर खासदारांचा निकाल; २० खासदारांवर अपात्रतेची टांगती तलवार

Chandrapur Firing: न्यायालयासमोरच गोळीबार! नाराळपाणी दुकानावर उभ्या असलेल्या तरुणावर धाडधाड झाडल्या गोळ्या

साखरेचे दर शंभरी पार जाणार? ऐन सणासुदीत साखर क़डू

नागपूरमध्ये क्लोरीन वायूची गळती, 40 जणांवर उपचार, 5 गंभीर, जलशुद्धीकरण प्रकल्प भरवस्तीत कसा?

कचोरी आणि बिर्याणीत उंदरांच्या लेंड्या, किळसवाण्या प्रकारामुळे नागरिकांचा संताप

SCROLL FOR NEXT