Tharala Tar Mag Saam Tv
मनोरंजन बातम्या

Tharala Tar Mag: 'ज्योती ताईंच्या आठवणी जाग्या...'; पूर्णा आजीच्या एन्ट्रीवर जुई गडकरी झाली भावूक, म्हणाली- 'रोहिणी ताई सेटवर...'

Tharala Tar Mag Marathi Serial: सध्या लोकप्रिय मालिका ‘ठरलं तर मग’ चर्चेचा विषय ठरली आहे. या मालिकेत सर्वांच्या आवडत्या ‘पूर्णा आजी’ या पात्रात आता प्रसिद्ध अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी झळकणार आहेत.

Shruti Vilas Kadam

Tharala Tar Mag: मराठी टीव्हीवर सध्या लोकप्रिय ठरलेली मालिका ‘थरलं तर मग’ सध्या चर्चेचा विषय ठरली आहे. या मालिकेत सर्वांच्या आवडत्या ‘पूर्णा आजी’ या पात्रात आता प्रसिद्ध अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी झळकणार आहेत. ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर यांच्या निधनानंतर ही भूमिका कोण साकारणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. आता रोहिणी हट्टंगडींची एन्ट्री जाहीर झाल्यानंतर प्रेक्षकांच्या उत्सुकतेला उधाण आले आहे.

मालिकेत मुख्य भूमिका साकारणारी जुई गडकरी हिने या नव्या बदलाबद्दल दिलेली पहिली प्रतिक्रिया सर्वांच्या मनाला भिडणारी ठरली. ती म्हणाली, “रोहिणी ताई सेटवर आल्या त्या क्षणी माझं मन अगदी भावुक झालं. त्या पूर्णा आजीच्या रुपात दिसल्या आणि मला त्यांना मिठी मारावीशी वाटली. त्यांच्या चेहऱ्यावरचं ते शांत हास्य आणि डोळ्यांमधली ती ममता पाहून ज्योती ताईंच्या आठवणी जाग्या झाल्या.”

जुई पुढे म्हणाली, “ ज्योती ताई माझ्या खूप जवळची होते. त्या सेटवर सर्वांना प्रोत्साहन देणाऱ्या आणि नेहमी हसतमुख राहणाऱ्या होत्या. त्यांच्या जाण्याने आम्हा सगळ्यांच्या मनात एक पोकळी निर्माण झाली होती. त्यामुळे ‘पूर्णा आजी’च्या भूमिकेत कोण येणार याची आम्हालाच उत्सुकता होती. पण जेव्हा कळलं की रोहिणी ताई ही भूमिका करणार आहेत, तेव्हा आम्हाला खूप समाधान वाटलं.”

रोहिणी हट्टंगडी या मराठी, हिंदी आणि रंगभूमीवरील अत्यंत अनुभवी अभिनेत्री आहेत. ‘सारांश’, ‘गांधी’, ‘अर्थ’ यांसारख्या चित्रपटांतील त्यांच्या भूमिकांना आजही प्रेक्षक विसरू शकलेले नाहीत. त्यामुळे ‘ठरलं तर मग’मध्ये त्यांची एन्ट्री ही मालिकेसाठी मोठी ताकद ठरणार आहे.

जुईने पुढे सांगितले, “रोहिणी ताई सेटवर आल्या आणि सगळं वातावरण उजळलं. त्यांच्या येण्याने सगळ्यांना एक नवा आत्मविश्वास मिळाला. त्या अनुभवी कलाकार असल्याने त्यांच्या उपस्थितीने आमचं काम आणखी छान होईल, याची खात्री आहे.”

'ठरलं तर मग’ ही मालिका आपल्या वेगळ्या कथानकामुळे आणि पात्रांच्या भावनिक बांधणीमुळे प्रेक्षकांच्या मनात घर करून बसली आहे. सायली आणि अर्जुनच्या प्रेमकथेच्या पार्श्वभूमीवर आधारलेल्या या मालिकेत आता पूर्णा आजी पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या हृदयात स्थान मिळवतील, यात शंका नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: आजपासून हिवाळी अधिवेशन, नागपूरमध्ये राजकीय वातावरण तापणार

Bigg Boss Winners List : बिग बॉस सीझन 1 ते 19; कोण कोण ठरलं BB ट्रॉफीचे मानकरी? पाहा विजेत्यांची यादी

Bigg Boss 19 Winner Gaurav Khanna : पहिल्या नजरेत प्रेम! ९ वर्षांचा संसार; फिल्मी स्टाइल प्रपोज, वाचा गौरव खन्नाची प्यारवाली लव्हस्टोरी

Bigg Boss 19 Winner: गौरव खन्नाने उचलली 'बिग बॉस 19'ची ट्रॉफी; फरहाना भट्टला दिली मात

Bigg Boss 19 - Pranit More : 'बिग बॉस १९' चे घर गाजवणाऱ्या महाराष्ट्रीयन भाऊची संपत्ती किती?

SCROLL FOR NEXT