Tharala Tar Mag Saam tv
मनोरंजन बातम्या

Tharala Tar Mag: 'ठरलं तर मग'मध्ये मोठा ट्विस्ट! प्रॉपर्टी कागद लपवताना प्रिया कृष्णाच्या तावडीत सापडणार

Tharala Tar Mag: ‘ठरलं तर मग’च्या 5 मे एपिसोडमध्ये प्रियाचा प्रॉपर्टी कागद लपवण्याचा प्लॅन फसतो. कृष्णाच्या तावडीत सापडल्याने कथानकात मोठा ट्विस्ट आणि नाट्यमय घडामोडी पाहायला मिळतात.

Shruti Vilas Kadam

Tharala Tar Mag: स्टार प्रवाहवरील ठरलं तर मग या लोकप्रिय मालिकेच्या ५ मे २०२६ च्या भागात प्रेक्षकांना जबरदस्त ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. कथानक अधिकच रंगतदार होत असताना प्रियाचा आणखी एक डाव फसणार आहे.

या भागात सायली आणि अर्जुन हे संतोषच्या घरी पोहोचतात. संतोष हा प्रियाचा माणूस असून, तिचे गुन्हे झाकण्यासाठी तो स्वतःवर आरोप घेत असल्याचे समोर येते. मात्र संतोषची पत्नी या सर्व प्रकारामुळे संतापलेली असते आणि सुरुवातीला अर्जुनवरच आरोप करते. नंतर सायली तिला समजावते आणि खरी परिस्थिती उघड होते.

संतोषच्या पत्नीच्या बोलण्यातून महत्त्वाचा धागा समोर येतो. ती सांगते की संतोष लहान-मोठ्या चोरीत सहभागी होता, पण खूनासारखा गंभीर गुन्हा तो करू शकत नाही. काही दिवसांपूर्वी त्याला एका कामासाठी मोठी रक्कम मिळाली होती, मात्र त्या कामाबद्दल त्याने काहीही सांगितले नव्हते. यामुळे सायली आणि अर्जुन यांना संशय येतो की प्रियानेच संतोषला पैसे देऊन प्रॉपर्टीशी संबंधित महत्त्वाचे कागद लपवण्याचे काम दिले असावे.

दरम्यान, प्रियाचा हा प्लॅन पुढे जाऊन पूर्णपणे फसतो. ती ज्या ठिकाणी कागद लपवण्याचा प्रयत्न करते, तिथेच ती थेट कृष्णाच्या तावडीत सापडते. हा प्रसंग मालिकेत मोठा टर्निंग पॉइंट ठरतो. या घडामोडींमुळे प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. प्रियाचे कारस्थान उघड होणार का? सायली आणि अर्जुन सत्य बाहेर आणण्यात यशस्वी होणार का? हे पाहण्यासाठी पुढील भाग महत्त्वाचे ठरणार आहेत.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT