TRP Rating Of Marathi Serials
TRP Rating Of Marathi Serials  Saam TV
मनोरंजन बातम्या

TRP Rating: 'आई कुठे काय करते' मालिकेला मागे टाकत स्टार प्रवाहवरील या मालिकेने मारली बाजी

Pooja Dange

TRP Rating Of Marathi Serials: टीव्ही चॅनेलचा लेटेस्ट टीआरपी रिपोर्ट आला आहे. या टीआरपी रिपोर्टमध्ये नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'ठरलं तर मग' या मालिकेने बाजी मारली आहे. तर सर्वात जास्त पहिली जाणारी मालिका 'आई कुठे काय करते' दुसऱ्या क्रमांकावर आहे.

'ठरलं तर मग' ही मालिका १० आठवड्यांपूर्वी टेलिकास्ट होण्यास सुरुवात झाली. तेव्हापासून ही मालिका टीआरपीमध्ये पहिल्या नंबरवर आहे. या मालिकेत जुई गडकरी आणि अमित भानुशाली लीड रोलमध्ये दिसत आहेत. पती-पत्नीची एक वेगळी लव्ह स्टोरी प्रेक्षकांच्या पसंतीस येत आहे.

'आई कुठे काय करते' ही मालिका दुसऱ्या स्थानावर आहे. मालिकेतील यशाच्या लग्नाचा सिक्वेन्समुळे या मालिकेला तिचे तिसरे स्टेषन टिकविण्यात यश मिळाले आहे असे आपण म्हणू शकतो. गेल्या आठवड्यात ही मालिका तिसऱ्या स्थानावर होती. (Latest Entertainment News)

तर 'सुख म्हणजे नक्की काय असतं' ही मालिका टीआरपी रँकिंगमध्ये तिसऱ्या क्रमांकावर आहे. सध्या या मालिकेत आलेल्या ट्विस्टने या मालिकेला खाली पडू दिले नाही. प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यात मालिका यशस्वी ठरली आहे.

'रंग माझा वेगळा' ही मालिका चौथ्या क्रमांकावर आहे. गेल्या आठवड्यात ही मालिका पाचव्या क्रमांकावर होती. ही मालिका १६ वर्ष पुढे गेली आहे. त्यामुळे मालिकेतील प्लॉट प्रेक्षकांना रंजक वाटत आहे आणि त्याच्याच परिमाण मालिकेच्या टीआरपीवर झाला आहे.

अभिजित खांडकेकर आणि प्रिया मराठे असलेली मालिका 'तुझेच मी गीत आहे' ही मालिका गेल्या आठवड्यात चौथ्या क्रमांकावर होती. आता ही मलिक पाचव्या क्रमांकावर आहे.

यावर्षीच्या सोळाव्या आठवड्यातील ही टीआरपी रॅकिंग आहे. १५ एप्रिल ते २१ एप्रिलपर्यंतच्या रेटिंग यावेळी काउंट करण्यात आली आहे. या आठवड्यातील रेटिंग चार्ट पाहिला तर पहिल्या पंधरा मालिका या स्टार प्रवाहावरील आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Special Report : Pune Lok Sabha | भाजपची हॅट्रीक की कॉंग्रेसचं कमबॅक?

Rohit Pawar News | बारामतीच्या प्रचारातील व्हिडीओ व्हायरल, प्रचाराचे पैसे न दिल्याचा आरोप

Poha Idli : सकाळी नाश्त्यात बनवा पोहा इडली; जाणून घ्या रेसिपी

Today's Marathi News Live : महायुतीचा पालघरमधील तिढा सुटला

Special Report : निवडणूक आयोगाच्या सुधारित टक्केवारीवरून वाद, आयोगावर नेमका कुणाचा दबाव?

SCROLL FOR NEXT