Salman Khan-Karan Johar Movie: २५ वर्षानंतर सलमान खान - करण जोहर अॅक्शन करताना दिसणार एकत्र

Salman-Karan Working Together: सलमान त्याच्या आगामी चित्रपट बॉलिवूडचा टॉपचा फिल्म मेकर करण जोहारसोबत करणार आहे
Salman Khan-Karan Johar Movie:  २५ वर्षानंतर सलमान खान - करण जोहर अॅक्शन करताना दिसणार एकत्र

Salman-Karan Working Together On Action Movie: बॉलिवूड सुपरस्टार सलमान खानसाठी ईद स्पेशल आहे. या ईदला त्याचा 'किसी का भाई किसी की जान' प्रदर्शित झाला. परंतु या चित्रपटाची जितकी चर्चा होती तितका प्रतिसाद मिळाला नाही. चित्रपट पाहून सलमानच्या फॅन्सचा देखील अपेक्षाभंग झाला. रिपोर्ट्सनुसार सलमान त्याच्या आगामी चित्रपटाची जोरदार तयारी करत आहे. त्याच्या हा चित्रपट पुढच्या वर्षीच्या ईदला प्रदर्शित होणार आहे.

सलमान त्याच्या आगामी चित्रपट बॉलिवूडचा टॉपचा फिल्म मेकर करण जोहारसोबत करणार आहे. स्वतः सलमानने याविषयी हिंट दिली आहे. सलमानने करण जोहारसोबत काम करणार असल्याचे सांगितले आहे. सलमान बोलणे त्या प्रोजेक्टवर शिक्कामोर्तब झाला असेच आहे.

Salman Khan-Karan Johar Movie:  २५ वर्षानंतर सलमान खान - करण जोहर अॅक्शन करताना दिसणार एकत्र
Dadasaheb Phalke Birth Anniversary: रेड लाईट एरियात गेले आणि... अशी शोधली फाळकेंनी भारतीय सिनेसृष्टीतली पहिली हिरोईन

सलमान नुकताच 'आप की अदालत'मध्ये उपस्थित राहिला होता. या शोमध्ये सलमान खानला विचारण्यात आले की, तू करण जोहरसोबत काम करणार आहेस? तेव्हा सलमान खान म्हणाला, कारण नेहमी म्हणतो त्याला माझी भीती वाटते. त्याच्या पहिल्या चित्रपटामध्ये मी त्याच्यासोबत काम केले होते मग घाबरायचे कशाला?' (Latest Entertainment News)

यशराज फिल्म्सच्या स्पाय युनिव्हर्समध्ये सलमान पुन्हा टायगर अवतारात परतणार आहे तसेच बऱ्याच वर्षानंतर आता आदित्य चोपडासोबत सतत काम करणार आहेस, असे सलमानला विचारण्यात आले. यावर सलमान म्हणाला, कारण जोहरने एक चित्रपट आहे हे सांगण्यासाठी फोन केला होता. हे सगळे मोठमोठे प्रोड्युसर-डायरेक्टर आहेत. त्यांना सुद्धा माझ्यसोबत काम करायचे आहे आणि मला सुध्या त्यांच्यासोबत काम करायचे आहे.

सलमानने करणसोबतच्या त्याच्या प्रोजेक्टची माहिती शेअर केली नाही. पण त्याच्या चित्रपटाची पुष्टी करताना करणला जबरदस्त अॅक्शन एन्टरटेनर बनवायचे आहे असे म्हटले आहे. या प्रोजेक्टची कमान त्यांनी 'शेरशाह' बनवणाऱ्या दिग्दर्शक विष्णुवर्धनकडे सोपवली आहे. रिपोर्ट्सनुसार, हा एक बिग बजेट अॅक्शन फिल्म असेल आणि त्याची स्क्रिप्ट वगैरे फायनल करण्याचे काम सुरू आहे.

सलमान यंदाच्या दिवाळीला 'टायगर 3' मध्ये दिसणार आहे,असे म्हटले जात आहे. तर करणसोबतचा त्याचा चित्रपट 2024 च्या ईदला रिलीज होणार आहे. सलमानने यापूर्वी करणच्या 'कुछ कुछ होता है' या चित्रपटात सहाय्यक भूमिका केली होती. 25 वर्षांनंतर इंडस्ट्रीतील ही दोन मोठ्या व्यक्ती काय नवीन आणतात याची चाहत्यांना वाट पाहावी लागणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com