Box Office Collection SAAM TV
मनोरंजन बातम्या

Box Office Collection : बॉक्स ऑफिसवर 'थामा'चा जलवा; तर 'एक दीवाने की दीवानियत' फ्लॉप? वाचा संडे कलेक्शन

Thamma vs Ek Deewane ki Deewaniyat Collection : रश्मिका मंदानाचा 'थामा' चित्रपट लवकरच 100 कोटींचा टप्पा पार करणार आहे. तर 'एक दीवाने की दीवानियत' च्या कलेक्शनमध्ये घसरण पाहायला मिळत आहे. चित्रपटांचे संडे कलेक्शन वाचा.

Shreya Maskar

'थामा' आणि 'एक दीवाने की दीवानियत' दोन्ही चित्रपट 21 ऑक्टोबरला थिएटरमध्ये रिलीज झाले आहेत.

'थामा' लवकरच 100 कोटींचा टप्पा पार करणार आहे.

'एक दीवाने की दीवानियत' 50 कोटींचा व्यवसाय करेल.

सलमान खानच्या 'सिकंदर' नंतर रश्मिका मंदानाचा आयुष्मान खुरानासोबत 'थामा' (Thamma) चित्रपटात झळकत आहे. चित्रपटाने पहिल्या दिवसापासून बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. तर दुसरीकडे हर्षवर्धन राणेच्या 'एक दीवाने की दीवानियत' चित्रपटाने तरुणाईला वेड लावले आहे. हे दोन्ही चित्रपट एकाच दिवशी 21 ऑक्टोबरला थिएटरमध्ये रिलीज झाले आहेत. पहिल्या रविवारी चित्रपटांनी किती कोटींचा व्यवसाय केला जाणून घेऊयात.

'थामा' बॉक्स ऑफिस कलेक्शन दिवस 6

'थामा' चित्रपट रिलीजच्या पहिल्या दिवसापासून बक्कळ कमाई करत आहे. रश्मिका मंदानाच्या चित्रपटाने पहिल्या दिवशी 24 कोटी, दुसऱ्या दिवशी 18.6 कोटी, तिसऱ्या दिवशी 13 कोटी, चौथ्या दिवशी 10 कोटी आणि पाचव्या दिवशी 13 कोटी रुपयांची बक्कळ कमाई केली आहे. 'थामा'ने सॅकनिल्कच्या रिपोर्टनुसार, सहाव्या दिवशी म्हणजे पहिल्या रविवारी तब्बल 13 कोटी रुपयांचा व्यवसाय केला आहे. चित्रपटाने एकूण 91.70 कोटी कमावले आहेत. चित्रपट लवकरच 100 कोटींचा टप्पा गाठणार आहे.

'एक दिवाने की दिवानियत' बॉक्स ऑफिस कलेक्शन दिवस 6

'एक दिवाने की दिवानियत' चित्रपटाने ओपनिंग डे ला 9 कोटी रुपयांचा व्यवसाय केला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी 7.75 कोटी, तिसऱ्या दिवशी 6 कोटी , चौथ्या दिवशी 5.5 कोटी , पाचव्या दिवशी 5.75 कोटी रुपयांची कमाई केली. सॅकनिल्कच्या रिपोर्टनुसार, चित्रपटाने सहाव्या दिवशी म्हणजे रविवारी 6.75 कोटी रुपये कमावले आहेत. 'एक दिवाने की दिवानियत' चित्रपटाचे एकूण कलेक्शन 41.25 कोटी रुपये झाले आहे.

'थामा' लवकरच 100 कोटींचा टप्पा पार करणार आहे. तर 'एक दीवाने की दीवानियत' 50 कोटींचा व्यवसाय करेल. 'थामा' चित्रपटात रश्मिका मंदाना, आयुष्मान खुराना, नवाजुद्दीन सिद्दीकी सप्तमी गौड़ा, डायना पेंटी, वरुण धवन, संजय दत्त, अपारशक्ती खुराणा हे कलाकार झळकले असून ही एक हॉरर-कॉमेडी-लव्ह स्टोरी आहे. तर दुसरीकडे हर्षवर्धन राणेसोबत सोनम बाजवा 'एक दीवाने की दीवानियत' मध्ये झळकली आहे. चित्रपटातील यांची केमिस्ट्री चाहत्यांना खूपच आवडली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पाणी पुरवठा करणारी पाईप लाईन फुटली हजारो लिटर पाणी वाया

Maharashtra Politics: मविआमध्ये बिघाडी? काँग्रेसचा स्वबळाचा नाऱ्यानं अहिल्यानगरच राजकारण तापलं

भाजपला कुबड्यांची गरज नाही; अमित शहांनी कुणाला दिला इशारा? पाहा व्हिडिओ

Celibrity Divorce: १४ वर्षांचा सुखी संसार मोडला! टीव्ही इंडस्ट्रीतील आणखी एका कपलचा घटस्फोट; चाहत्यांना धक्का

'ती फक्त तळहातावर सुसाईड नोट लिहून...' डॉक्टर तरूणीच्या भावाला वेगळाच संशय

SCROLL FOR NEXT