Telugu actor Fish Venkat passes away on 19th july due to kidney failure 
मनोरंजन बातम्या

Famous Actor Passed Away: प्रसिद्ध अभिनेत्याचे किडनी फेलमुळे निधन; सिनेसृष्टीवर शोककळा

Actor Passed Away: तेलुगू चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेते आणि विनोदी कलाकार फिश वेंकट यांचे 18 जुलै 2025 रोजी निधन झाले.

Shruti Vilas Kadam

Famous Actor Passed Away: तेलुगू चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेते आणि विनोदी कलाकार फिश वेंकट यांचे 18 जुलै 2025 रोजी निधन झाले. त्यांच्या निधनाने संपूर्ण दक्षिण चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. फिश वेंकट हे मूळचे मंगळमपल्ली वेंकटेश असून, 53 वर्षांचे होते. त्यांचे निधन किडनी निकामी होण्यामुळे झाले. ते गेल्या अनेक महिन्यांपासून किडनी आणि लिव्हर फेल्युअरशी झुंज देत होते. त्यांच्यावर हैदराबादमधील एका रुग्णालयात उपचार सुरू होते. व्हेंटिलेटरवर असतानाच त्यांनी शेवटचा श्वास घेतला.

काही महिन्यांपासून ते गंभीर आजारी होते. त्यांच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्या होत्या आणि त्यांना डायलिसिसवर ठेवण्यात आले होते. उपचारांसाठी त्यांना सुमारे ५० लाख रुपयांची गरज होती. त्यांच्या कुटुंबाने आर्थिक मदतीचे आवाहनही केले होते, परंतु अपेक्षित मदत मिळाली नाही. अभिनेता पवन कल्याण यांनी २ लाखांची मदत केली होती, तसेच विश्वक सेन आणि एका तेलंगणा मंत्र्यांनी मदतीचा हात पुढे केला होता. मात्र वेळेत योग्य किडनी डोनर न मिळाल्याने त्यांच्यावर प्रत्यारोपण करता आले नाही.

फिश वेंकट हे तेलंगणाच्या बोलीभाषेतील त्यांच्या खास स्टाईलमुळे लोकप्रिय होते. त्यांनी आपल्या करिअरमध्ये 100 पेक्षा अधिक चित्रपटांत विनोदी व सहाय्यक भूमिका साकारल्या. ‘अर्जुन’, ‘गब्बर सिंग’, ‘अधुर्स’, ‘बन्नी’, ‘डी’, ‘डीजे टिल्लू’ अशा अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये त्यांच्या व्यक्तिरेखा प्रेक्षकांच्या लक्षात राहिल्या. त्यांनी एके काळी हैदराबादमध्ये मासळी विक्रेत्याचे काम केले होते म्हणून त्यांना ‘फिश वेंकट’ असे नाव पडले.

फिश वेंकट यांच्या पत्नी सुवर्णा आणि मुलगी श्रावंती असा परिवार आहे. अनेक चाहत्यांनी आणि चित्रपटसृष्टीतील सहकलाकारांनी सोशल मीडियावर श्रद्धांजली अर्पण केली. त्यांच्यावर हैदराबादमध्ये अंतिम संस्कार करण्यात येणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: अकोल्यात बकरीला वाचवण्यासाठी गेलेल्या व्यक्तीचा पाण्यात बुडुन मृत्यू

Kishor Kadam : किशोर कदम यांचे राहते घर धोक्यात; सरकारला केली विनंती, नेमकं प्रकरण काय?

दुहेरी हत्याकांडाने ठाणे हादरलं, भाजप नेत्याची कार्यलयातच हत्या, भिवंडीत रात्री ११ वाजता काय घडलं?

खोटं धर्मांतरण करून दुसरं लग्न, पोलीस कर्मचाऱ्याला सेवेतून बडतर्फ; धुळ्यात खळबळ

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहि‍णींना ऑगस्टचा हप्ता कधी येणार? संभाव्य तारीख आली समोर

SCROLL FOR NEXT