Urfi Javed
Urfi Javed  Saam Tv
मनोरंजन बातम्या

Urfi Javed: पोलिस चौकशीनंतर उर्फी पेटून उठली; ट्वीट करत म्हणते, “त्यांना हिंदु राष्ट्र हवे आहे, तर...”

Chetan Bodke

Urfi Javed: उर्फी जावेद आणि चित्रा वाघ यांच्यातील वाद गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. दोघीही एकमेकींवर अनेक आरोप-प्रत्यारोप करत आहेत. मुंबईच्या रस्त्यावर उर्फीने अंगप्रदर्शन केल्या प्रकरणी मुंबई पोलिसांनी तिला नोटीस पाठवली होती. त्यामुळे आज उर्फीची आंबोली पोलिसांनी तब्बल दीड तास चौकशी केली. आता पुन्हा एकदा उर्फी ट्वीटच्या माध्यमातून चांगलीच पेटून उठली आहे.

आज उर्फीने अंबोली पोलिस ठाण्यात हजेरी लावत पोलिसांना चौकशीसाठी सहकार्य केले. पोलिस चौकशी पुर्ण होताच उर्फीचे काही ट्वीट्स सोशल मीडियावर वाऱ्यासारखे व्हायरल होऊ लागले आहेत. तिने या ट्वीट्समध्ये भारतीय संस्कृतीवर भाष्य करत ट्वीट केले आहे.

पहिल्या ट्वीटमध्ये उर्फी म्हणते, "प्राचीन हिंदू स्त्रिया अशाप्रकारे पेहराव करत असत. हिंदू उदारमतवादी होते, शिक्षित होते, स्त्रियांना त्यांचे कपडे निवडण्याची मुभा होती. तर त्यांचा खेळ, राजकारणात सक्रिय सहभाग होता. ते लिंग आणि स्त्री शरीर या विषयावर सकारात्मक लोक होते. प्रथम भारतीय संस्कृतीबद्दल जाणून घ्या. "

सोबतच ती आणखी एका ट्वीटमध्ये म्हणते, “मी तुम्हाला सांगते 'भारतीय संस्कृती'चा काय भाग नाही, बलात्कार, डान्स बार, राजकारणी महिलांना तिच्या कपड्यांमुळे खुलेआम जीवे मारण्याची धमकी देऊ शकत नाही.”

तर तिसऱ्या ट्वीटमध्ये उर्फी म्हणते, “एकीकडे त्यांना हिंदु राष्ट्र हवे आहे, तर दुसरीकडे महिलांच्या कपड्यांवर नियंत्रण ठेवण्याचे तालिबानी नियम लागू करायचे आहेत. हिंदू धर्म हा सर्वात जुना धर्म आहे, तो स्त्रियांच्या बाबतीत खूप उदारमतवादी म्हणून ओळखला जातो. मग तुम्ही कुठल्या संस्कृतीबद्दल बोलताय?”

सध्या तिच्या या ट्वीट्सची पुन्हा एकदा सोशल मीडियावर चर्चा होत आहे. तिच्या या ट्वीटला काही नेटकऱ्यांनी ट्रोल केले आहे, तर काहींनी तिच्या या ट्वीटला समर्थन दिला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's Marathi News Live : पुण्यात मतदानानंतर गुन्हेगारी वाढली; कोयता गँगकडून एकाची हत्या

Dance Viral Video: 'तेरे मेरे होंटो पें' रोमँटिक गाण्यावर काकींचा मनालीमध्ये जबरदस्त डान्स; ४० वर्षांनी पूर्ण केले स्वप्न; VIDEO VIRAL

Swati Maliwal Assult Case: स्वाती मालीवाल प्रकरण नेमकं काय, एफआयआरमध्ये नेमके कोणते आरोप केले?

Sangli News : कॅफे शॉपमध्ये अश्लील चाळे, शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्तान संघटना आक्रमक; सांगलीतील ३ कॅफे एकापाठोपाठ एक फोडले

Anil Deshmukh News : शरद पवार थांबलेल्या हॉटेलमध्ये सुनील तटकरे येऊन गेले; अनिल देशमुख यांचा गौप्यस्फोट

SCROLL FOR NEXT